जिल्ह्यातील सर्व शाळा,  महाविद्यालय बंद राहणार  ; जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी  ; शैक्षणिक खासगी क्लासेस,  औद्योगिक व्यवसाय प्रशिक्षण केंद्र यांचा समावेश


जिल्ह्यातील सर्व शाळा,  महाविद्यालय बंद राहणार 
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी  ; शैक्षणिक खासगी क्लासेस,  औद्योगिक व्यवसाय प्रशिक्षण केंद्र यांचा समावेश
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : राज्य शासनाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897 लागू केला आहे. या अन्वये करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून  सांगली जिल्ह्यातील (शहरी व ग्रामीण)सर्व शाळा , महाविद्यालय, शैक्षणिक खाजगी क्लासेस ,औद्योगिक व व्यवसाय प्रशिक्षण केंद्र इत्यादी दिनांक 15 ते 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी संबधित यंत्रणांना दिले आहे.
तथापि, 10 वी व 12 वीच्या परिक्षा तसेच विश्वविद्यालयाच्या परीक्षा विहित वेळापत्रकानुसार घेण्यात याव्यात, आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाही. यासाठी आवश्यक ती दक्षता व खबरदारी घेण्याची सूचना संबधित संस्थाप्रमुखांना देण्याबाबतही निर्देशित केले आहे.
याबाबत सर्व शासकीय , निमशासकीय व खाजगी आस्थापनांना निर्देश देण्यात आले आहेत त्याप्रमाणे तात्काळ कार्यवाही करण्यात आली आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्था आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 860 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 


दैनिक माणदेश एक्सप्रेस whatasapp वर Free मिळविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured