कोरोनाबाबत दिघंचीत बैठक,नागरिकांनी भीती न बाळगता जागरूक राहण्याचे सरपंच अमोल मोरे यांचे आवाहन

कोरोनाबाबत दिघंचीत बैठक,नागरिकांनी भीती न बाळगता जागरूक राहण्याचे सरपंच अमोल मोरे यांचे आवाहन

कोरोनाबाबत दिघंचीत बैठक,नागरिकांनी भीती न बाळगता जागरूक राहण्याचे सरपंच अमोल मोरे यांचे आवाहन
माणदेश एक्सप्रेस न्युज
दिघंची/प्रतिनिधी : प्राथमिक आरोग्य केंद्रात सरपंच अमोल मोरे यांच्या पुढाकाराने कोरोनाबाबत तातडीने बैठक बोलवण्यात आली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साधना पवार यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी स्वच्छतेबाबतच्या उपाययोजना, नागरिकांना प्रबोधन करणे, आजाराबाबतचे समज गैरसमज याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच नागरिकांनी लांब पल्ल्याचे  प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले.
दिघंची ग्रामपंचायत कडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन सरपंच अमोल मोरे यांनी दिले. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता आजाराबाबत काही शंका  असल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. सर्वांनी मिळून या अस्मानी संकटाचा मुकाबला करू असे आवाहन सरपंच अमोल मोरे यांनी केले. आजाराबाबत भीती न बाळगता नागरिकांनी जागरूक राहण्याचे आवाहन डॉ साधना पवार यांनी केले.

दैनिक माणदेश एक्सप्रेस whatasapp वर Free मिळविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.

Post a comment

0 Comments