आटपाडीतील पिग्मी एजंटांचे आर्थिक हाल 

आटपाडीतील पिग्मी एजंटांचे आर्थिक हाल 


आटपाडीतील पिग्मी एजंटांचे आर्थिक हाल 
संचारबंदीमुळे संपूर्ण व्यवसाय बंद ; पिग्मीच्या माध्यमातून मिळणारे कमिनन झाले बंद 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/बिपीन देशपांडे : संचारबंदी लागू असल्याने आर्थिक व्यवहार ठप्प असून दुकाने बंद असल्याने बँक व पतसंस्थेची पिग्मी बंद झाली आहे. यामुळे कर्जाचे हप्ते कसे भरायचे? घरातला खर्च कसा चालवायचा? अशी चिंता व्यवसायिकांना लागली असून आर्थिक चक्र बिघडले आहेच. परंतु त्यामुळे पिग्मी एजंटांचे मात्र मोठे आर्थिक नुकसान होवू लागले असून पिग्मीच्या माध्यमातून मिळणारे कमिशन बंद झाल्याने त्यांच्यापुढे जगायचे कसे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 
आटपाडी शहरात 100 हून पिग्मी एजंट असून राष्ट्रीयीकृत बँका, पतसंस्था मोठ्या प्रमाणात आहे. दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते. बँक व पतसंस्थेच्या माध्यमातून व्यवसायिकांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते. पिग्मीच्या माध्यमातून त्याची अनेकजण परतफेड करत असतात तर काहीजण बचत करतात. दुपारी चारनंतर एजंट पिग्मी गोळा करून दुसऱ्या दिवशी बँकेत भरणा करतात.  सरासरी पिग्मी एजंटाला महिन्याकाठी 10 ते 15 हजार रुपये कमिशन मिळते. ‘कोरोना; या संसर्गजन विषाणूमुळे पिग्मी बंद झाली आहे. अनेक पिग्मी एजंट या कमिशनवर अवलंबून असून त्यांची घालमेल सुरू आहे. संचारबंदी वाढणार का? उठणार. व्यापार पेठ कधी सुरळीत होणार? असे अनेक प्रश्न पिग्मी एजंटांना सतावत असून, अजुन किती दिवस काढावे लागणार या विवंचनेत आहेत. ज्या पिग्मी एजंटांना उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही त्यांना सर्व स्तरातून मदत व्हावी करावी अशी मागणी पिग्मी एजंट करीत आहेत.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments