सातारा पोलिसांची तातडीचे प्रवासासाठी ऑनलाईन परवानगी सुविधा


सातारा पोलिसांची तातडीचे प्रवासासाठी ऑनलाईन परवानगी सुविधा
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला : सातारा जिल्ह्यातील लोकांना लॉकडाऊनच्या दिवसांमध्ये तातडीने किंवा अत्यावश्यक कारणाकरिता प्रवास करावा लागणार असेल तर अशा व्यक्तींना प्रवासाची परवानगी देण्यासाठी पोलीस यंत्रणेमार्फत ऑनलाइन प्रणाली तयार करण्यात आली आहे. सदर व्यक्तींनी प्रवास करण्यासाठी खालील लिंकवरून अर्ज भरून सातारा पोलिस प्रशासनाची मान्यता घेणे आवश्यक आहे. http://satarapolice.techcubesolutions.in/ ऑनलाईन प्रणालीवरुन प्राप्त अर्जाची सातारा पोलीसांमार्फत पडताळणी केली जाईल. सदर परवानगी प्राप्त झाल्यानंतरच सदर व्यक्ती प्रवास करु शकेल.  लिंकवरील आवश्यक माहिती भरुन अर्ज दाखल केल्यानंतर सदर व्यक्तीला VM-SPSTRA या sms आयडीद्वारे अर्ज क्रमांक प्राप्त होणार आहे. सातारा पोलिसांमार्फत पडताळणीनंतर अर्ज स्वीकारला अथवा नाकारला गेला हे SMS द्वारे कळवण्यात येणार आहे.  SMS मध्ये देण्यात आलेल्या लिंकवरून प्रवास परवानगी डाउनलोड करणे गरजेचे आहे. प्रवास करताना पोलिसांनी चौकशी केली असता सदर परवानगी दाखवणे बंधनकारक असणार आहे. 


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured