Type Here to Get Search Results !

खरसुंडीत आरोग्य केंद्राच्या परिसरात २९ जण होम क्वारंटाईन


खरसुंडीत आरोग्य केंद्राच्या परिसरात २९ जण होम क्वारंटाईन
माणदेश एक्सप्रेस न्युज 
मनोज कांबळे / खरसुंडी : आटपाडी तालुक्यातील खरसुंडी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात जिल्हा व राज्य बाहेरून आलेल्या २९ व्यक्तींना खरसुंडी येथे होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. खरसुंडी येथील एक व्यक्ती बँक ऑफ महाराष्ट्रचा कर्मचारी सांगोला तालुक्यात कार्यरत आहे. खरसुंडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नेलकरंजी ते झरे परिसरातील २५ गावांचा समावेश आहे. या गावांमधील गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, गुजरात राज्यांतून जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने गलाई व्यवसायिक व काही नोकरदार गावी आले आहेत. या २९ जणांना स्वतःच्याच घरी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.एम.एम जाधव यांनी दिली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने प्रत्येक गावात इतर राज्यांतून व जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यांच्या नोंदी ठेवून माहिती घेण्यात येत आहे.


जीवाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कमर्चारी यांनी केलेल्या कार्याला सलाम !
तू विठ्ठल, मौला, मेरा, तु आसरा सबकुछ मेरा !




खरसुंडी येथील एक व्यक्ती सांगोला तालुक्यातील वाटंबरे  येथे बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. या शाखेतील कॅशियरच्या बंधूला कोरोना संसर्गाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कॅशियर याची कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. सध्या खरसुंडी येथे राहत असलेला कर्मचारी या शाखेत कामाला जात होता. यामुळे या कर्मचाऱ्यास त्याच्या घरीच होम क्वारंटाईन केले आहे. लोकांनीही आरोग्य खात्यास सहकार्य करण्याची गरज आहे. खरसुंडी ग्रामपंचायतीने ही मोठी दक्षता घेतली आहे. ग्रामीण भागातील इतर ठिकाणी असणारे लोक गावाकडे कोणत्या ना कोणत्या मार्गाने येत आहेत. 


राज्य व जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या नागरिकांनी प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. बाहेरून आलेल्या नागरिकांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सल्ल्यानुसार स्वतःला होम क्वारंटाईन करून सहकार्य करावे.
सरपंच 
लता अर्जुन पुजारी


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies