Type Here to Get Search Results !

सांगोला पोलिसांचा बेकायदेशीर व अवैध दारू वाहतुकीवर छापा  ;  ५ लाख ५२ हजारासह अवैध दारू व बोलोरो गाडी जप्त ; दोघांना अटक 


सांगोला पोलिसांचा बेकायदेशीर व अवैध दारू वाहतुकीवर छापा 
 ५ लाख ५२ हजारासह अवैध दारू व बोलोरो गाडी जप्त ; दोघांना अटक 
माणदेश एक्सप्रेस न्युज
अजनाळे/प्रतिनिधी : सांगोला पोलिसांनी बेकायदेशीर व अवैध दारू बाहतूक करणाऱ्यांना पकडले असून ५ लाख ५२ हजारासह अवैध दारू व बोलोरो गाडी जप्त करण्यात आली आहे. 
याबाबत अधिक माहिती अशी की, सांगोला पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार डी. १० रोजी सायंकाळी ८.३० च्या सुमारास जवळा ते हातीद जाणरे रोडवर पोलीस अधीक्षक मनोज पाटील सोलापुर ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे सोलापुर ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील मंगळवेढा विभाग मंगळवेढा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक राजेश गवळी सांगोला पोलीस ठाणे यांच्या देखरेखीखाली सांगोला पोलीस ठाणेकडील सहा.पो.नि. प्रशांत हुले, सहा.पो.फौ. लतीफ मुजावर, सहा.पो.फौ. कल्याण ढवणे, पोना. संजय चंदनशिवे, पोना. संदेश शिकतोडे, पोकॉ. वैजिनाथ कुंभार, मपोकॉ. सिमा सोनवणे दबा धरून बसले.



याचवेळी गाडी क्र. एमएच-४५-एन-३२४७ या बोलोरो गाडीला पाठलाग करून पकडले असता सदर गाडीतून मॅकडॉवेल व्हीस्की, इम्पेरीयल ब्ल्यु, ऑफीसर चॉईस, गोल्ड ड्रायनीज ओडका, बॅगपायपर, किंगफिशर, टॅगो पंच कंपनीच्या बाटल्या, रॉयल चॅलेंज, रॉयल स्टॅग, सिग्नेचर, जॉकी रॉज रम, देशी दारु संत्रा अशा देशी विदेशी दारुच्या बाटल्या कि. ९९८४०/- रुच्या तसेच बोलेरो गाडी किं. ४00000/- असा एकुण ४९९८४०/- रुचा ऐवज जप्त केला. त्यानंतर सदरची बेकायदेशीर वाहतुक करणारे आरोपी सुनील नामदेव गव्हाण तसेच औदुंबर आण्णासो लवटे दोघे रा. कडलास ता. सांगोला यांच्याकडे विश्वासात घेवुन चौकशी करुन दि. ११/०४/२०२० रोजी पहाटे ०२:00 वा आरोपी सुनील नामदेव चव्हाण यांच्या घराच्या बाजुस असलेल्या गोठयातुन वर नमुद वर्णनापैकी ५३००३/- रुच्या देशी विदेशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या असुन सदरवेळी एकुण ५५२८४३/- रु किमतीच्या दारुच्या बाटल्या बोलेरो गाडीसह जप्त केलेल्या आहेत. सदरबाबत पोलीस नाईक चंदनशिवे यानी आरोपी सुनील नामदेव गव्हाण तसेच औदुंबर आण्णासो लवटे दोघे रा. कडलास ता. सांगोला यांच्याविरुध्द तक्रार दिलेने सांगोला पोलीस ठाणेस महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई), भा. द. वि. क. १८८, २६९, २७०, तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा सन २००५ चे कलम ५१ (ब), महाराष्ट्र पोलीस कायदा सन १९५१ चे कलम ३७(३)/१३५, साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम सन १८९७ चे कलम २, ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास सपोफौ. मुजावर करीत आहेत. संचारबंदी व लॉक डाउनच्या काळात अशा प्रकारे बेकायदेशीर दारुची वाहतुक करुन चढया दराने विक्री होत असलेची माहिती वर नमुद पोलीसानी काढुन सदरची कौतुकास्पद कारवाई वरीष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे. सदरची मोहिम अधिक तीव्र करुन ठोस कायदेशीर कारवाई करणार असलेचे पो. नि. राजेश गवळी सांगोला पोलीस ठाणे म्हणाले.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies