विटा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार रक्तदान : 05 एप्रिल शाळा क्र 13 येथे  उपस्थितीचे आवाहन

विटा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार रक्तदान : 05 एप्रिल शाळा क्र 13 येथे  उपस्थितीचे आवाहन


विटा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार रक्तदान : 05 एप्रिल शाळा क्र 13 येथे  उपस्थितीचे आवाहन
माणदेश एक्सप्रेस न्युज
विटा/प्रतिनिधी :  विटा येथील शाळा क्रमांक 13 शाहुनगर परिसरांमध्ये रविवार 5 एप्रिल 2020 रोजी कोरोना विषाणू संसर्ग च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे याच उद्देशाने गरजू रूग्णांना रक्तपुरवठा त्वरित व्हावा यासाठी विटा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूनगर नवरात्र मंडळ, डीजे ग्रुप विवेकानंदनगर, छत्रपती संभाजीराजे कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ तसेच गजानन निकम, पंकज दबडे, मधुकर पाटील, श्रीकांत कोरडे, समीर शेख, प्रकाश चौगुले, संजय जाधव, सुनील साळुंखे, बापू भूमकर, हर्षल निकम, अशिष पवार, मुकेश जगताप,  यांचेवतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदानाबाबत महाराष्ट्रातील जनतेला केलेल्या आवाहनानुसार कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासते आहे. रक्ताचा तुटवडा महाराष्ट्रभर दिसून येत असल्यामुळे विट्यातील तरुणांनी एकत्र येऊन एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा उद्देशाने रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. यासाठी आदर्श ब्लड बँक सांगली यांची टीम या रक्तदान शिबिरांमध्ये सहभागी होणार आहे. सकाळी 9 ते 6 या वेळेत हे शिबिर पार पडेल.
रक्तदान शिबिर यावेळी विशेष खबरदारी म्हणून सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून ठराविक अंतरावर रक्तदात्यांची व्यवस्था केली जाणार आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी विटा पोलीस स्टेदशन विटा व नगरपरिषद आणि मंडळाचे पदाधिकारी विशेष लक्ष देणार आहेत. रक्तदात्यांना सन्मानपत्र यावेळी देण्यात येईल. तरी विटा शहरातील  नागरिकांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हावे. तसेच नाव नोंदणी साठी 9175149081, 8625099294, 7020115578 या क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करावी. असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments