Type Here to Get Search Results !

ज्येष्ठ समाजसेविका ॲड. अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन


ज्येष्ठ समाजसेविका ॲड. अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन
माणदेश एक्सप्रेस न्युज
सोलापूर : ज्येष्ठ समाजसेविका ॲड अपर्णा रामतीर्थकर यांचे आज मंगळवारी ११.५० च्या दरम्यान सोलापुरातील खासगी रुग्णालयात निधन झाले.
गुढीपाडव्यादिवशी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यावेळेसपासून त्या सोलापुरातील  हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. मात्र आज ११.५० मिनिटांनी त्यांचे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, तसेच मुलगा आशुतोष, सून रश्मी आणि नातू असा परिवार आहे. 
महिलांना कायदेविषयक हक्क आणि अधिकार यावर त्यांचा अभ्यास दांडगा होता. त्या स्वतः वकील असल्याने असंख्य महिलांना न्याय मिळवून दिला. आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील क्रांती गणेश क्रांती मंडळ वतीने दिघंची येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies