सोलापुरातील कोरोना बाधिताची संख्येत 1 ने वाढ, एकूण 13 जण कोरोनाग्रस्त :जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती 


सोलापुरातील कोरोना बाधिताची संख्येत 1 ने वाढ, एकूण 13 जण कोरोनाग्रस्त :जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती 
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगोला/प्रतिनिधी : सोलापुरातील कोरोना बाधिताची संख्येत 1 ने वाढ एकूण 13 जण कोरोनाग्रस्त असून यातील 12 जणांवर उपचार सुरू असल्याही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
आत्तापर्यंत सोलापुरात कोरोना चाचणीसाठी 646 जणांचे स्वॅब घेण्यात आले. यातील 486 जणांचे अहवाल आज सायंकाळपर्यंत प्राप्त झाले आहेत. यात 473 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज ज्या रुग्णाचा पॉझिटिव्ह अहवाल आला आहे, तो ठाणे येथून 15 तारखेला सोलापुरात आला होता. रविवार पेठ परिसरात आपल्या निवासस्थानी थांबला. तिथे त्रास वाढल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तो दाखल झाला. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. या रुग्णाची  माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रविवार पेठेतील सर्व वस्त्यांना जाणारे रस्ते बंद केले आहेत. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या अनेक जणांना तपासणीसाठी ताब्यातही घेतलं आहे.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured