विठ्ठलापूर मध्ये शेजारच्या शेतातील गवत जाळत असताना 18 डाळिंब झाडे जळून खाक, एक लाख रुपयांचे नुकसान

विठ्ठलापूर मध्ये शेजारच्या शेतातील गवत जाळत असताना 18 डाळिंब झाडे जळून खाक, एक लाख रुपयांचे नुकसान

विठ्ठलापूर मध्ये शेजारच्या शेतातील गवत जाळत असताना 18 डाळिंब झाडे जळून खाक, एक लाख रुपयांचे नुकसान
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : विठ्ठलापूर ता. आटपाडी, जि. सांगली येथील शेजारच्या शेतातील गवत जाळत असताना 18 डाळिंब झाडे जळून एक लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची फिर्याद आटपाडी पोलीस स्टेशनला बुकाबाई संभाजी बाड यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विठ्ठलापूर येथील शेत जमीन गट नंबर 452 मध्ये श्रीमती बुकाबाई संभाजी बाड यांच्या मालकीची डाळिंब बाग आहे. दिनांक 12 रोजी यातील आरोपी बालाजी पांडुरंग बाड, संतोष पांडुरंग बाड, पांडुरंग गणू बाड, शिवलिंग वसंत बाड,  सर्व रा. विठ्ठलापूर यांनी रघुनाथ महादेव बाड यांचे शेत जमिनीतील वाळलेले गवत व चिलारीचे झाड व बांधाचे गवत जाळत असताना फिर्यादीचे शेतातील डाळिंब पिकातील 18 डाळिंबाची झाडे जाळून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान केले आहे. सदर घटनेचा तपास पोलिस निरीक्षक बजरंग कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार चोरमले करीत आहेत.

Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free

Post a comment

0 Comments