आटपाडी शहरात पोलिसांची वाहनावरती कारवाई   ; संचारबंदी काळात मोकाट फिरणाऱ्या दुचाकी व चारचाकी घेतल्या ताब्यात  

आटपाडी शहरात पोलिसांची वाहनावरती कारवाई   ; संचारबंदी काळात मोकाट फिरणाऱ्या दुचाकी व चारचाकी घेतल्या ताब्यात  


आटपाडी शहरात पोलिसांची वाहनावरती कारवाई 
 संचारबंदी काळात मोकाट फिरणाऱ्या दुचाकी व चारचाकी घेतल्या ताब्यात  
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : संपूर्ण देशामध्ये कोरोना या संसर्गजन्य विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी व लॉकडाऊन असूनही आटपाडी शहरात मोकाट फिरणाऱ्या ६० दुचाकी व २ चारचाकी वाहनांवरती आटपाडी पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये एसटी स्टँड चौक २६ दुचाकी, सांगोला चौक १० दुचाकी, आटपाडी बाजार पटांगण चौक १० दुचाकी, आबानगर चौक १४ दुचाकी व २ चारचाकी  अशा एकूण 60 दुचाकी व २ चारचाकी अशा एकूण 62 गाड्या कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ताब्यात घेण्यात आलेल्या आहे. सदर कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे, एपीआय पाटील, पीएसआय कांबळे, पीएसआय पाटील, तसेच सहाय्यक पोलीस फौजदार, पोलीस हेड कॉन्स्टेबल, पोलीस नाईक, पोलीस,  होमगार्ड असे एकूण 25 जणांनी ही कामगिरी केली.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments