रेठरे धरण येथील 24 जणांची कोरोना चाचणी निगेटीव्ह : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


रेठरे धरण येथील 24 जणांची कोरोना चाचणी निगेटीव्ह : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : रेठरे धरण येथे राहून गेलेली व्यक्ती मुंबईत कोरोना बाधीत ठरल्यानंतर प्रशासनाने गतीमान हालचाली करून कुटुंबिय व निकटवर्तीय अशा 24 जणांना दिनांक 13 एप्रिल रोजी मध्यरात्री तर उर्वरीत 6 जणांना सकाळी 6 वाजता अशा एकूण 30 जणांना मिरज येथे दाखल करून त्यांचा स्वॅब कोरोना चाचणीसाठी पाठविला. यामधील 24 जणांचे स्वॅब निगेटीव्ह आले असून 6 जणांचा अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. 
सांगली जिल्ह्यात परदेशवारी करुन आलेले, सस्पेक्टस व कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अशा आतापर्यंत 1648 व्यक्ती आहेत. यापैकी 322 व्यक्ती आयसोलेशन कक्षात दाखल करून या सर्व व्यक्तींची कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 263 जणांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 26 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. यामधील निगेटिव्ह अहवाल आलेल्यांपैकी 22 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे . कोरोणाबाधित  दोन व्यक्तींसह अन्य दोन व्यक्ती मिरज येथे आयसोलेशन  कक्षात उपचार घेत आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. 33 व्यक्तींचे स्वॅब तपासणीचे अहवाल अद्याप अप्राप्त आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे. 
इन्स्टीट्युशनल क्वॉरंटाईनमध्ये 83 व्यक्ती (मिरज येथे 38, इस्लामपूर येथे 23 व शासकीय तंत्रनिकेतन 22) असून 14 दिवसाचा क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण झालेले 664 प्रवासी असून सद्यस्थितीत 579 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured