मुंबई फायरब्रिगेड मध्ये कार्यरत भूमीपुत्राचे  गावासाठी योगदान ! गावातील 25 कुटुंबांना दिले किराणा मालाचे साहित्य

मुंबई फायरब्रिगेड मध्ये कार्यरत भूमीपुत्राचे  गावासाठी योगदान ! गावातील 25 कुटुंबांना दिले किराणा मालाचे साहित्य


मुंबई फायरब्रिगेड मध्ये कार्यरत भूमीपुत्राचे  गावासाठी योगदान !
माणदेश एक्सप्रेस न्युज
निंबवडे/राघव मेटकरी :  आज संपूर्ण जग कोरोना शी दोन हात करण्यात गुंतलं आहे. इटली भुईसपाट होऊ पाहत आहे. तर अमेरिका गुडघे टेकत आहे. अशातच भारतासह राज्यातील सर्व शहर बंद आहेत. देश लॉकडाऊन असून हातावर पोट असणारी शेकडो कुटुंब आपल्या आसपास अडकून पडल्याचे आपण पाहत आहोत. अशा वेळी निंबवडे गावात गरजू व्यक्तींना किराणा मालाचे साहित्य वाटण्याचे काम मुंबई येथे फायरब्रिगेड मध्ये कार्यरत आप्पासाहेब मोटे यांनी केले आहे. त्यांनी गावातील 25 कुटुंबांना किराणा मालाचे साहित्य देऊन आज आपल्या गावप्रति ऋण व्यक्त केले आहेत. त्यांनी पाठवलेले किट  न्यू माणदेश युथ  फाउंडेशन चे अध्यक्ष दिलीप मोटे कार्याध्यक्ष, नानासाहेब झुरे खजिनदार जयंत देठे, मुख्य संघटक मुकेश देठे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले. 
जेव्हा जेव्हा आपला गाव आपला भाग अडचणीत येतो. तेव्हा आमची शिकवण आम्हांला स्वस्त बसू देत नाही. सांगलीच्या महापुरात सुद्धा आम्ही खारीचा वाटा उचलला होता. आताही गावात एकही कुटुंब उपाशी राहणार नाही याची खबरदारी घेऊ. मी सध्या आणीबाणी सेवेत मुंबई येथे असून कुटुंब गावी आहे. मी माझं स्वतःच सगळं घरीच बनवतो आणि ड्युटी सेवा म्हणून करत आहे. माझं बालपण शिक्षण ज्या मातीत गेलं त्या मातीसाठी काहीतरी करण्याची नेहमी इच्छा होते, तेव्हा आमचे बंधू इंजि. दादा मोटे, डॉ. बाळू नाथा मोटे यांच्यासह उपक्रमात सहभागी होतो. या मदतीचा मला आणि माझ्या परिवाराला अभिमान आणि आनंद वाटतो.
आप्पा नाथा  मोटे 
 फायरब्रिगेड, मुंबई


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments