कोरोना विरूध्दच्या लढाईत सर्व यंत्रणांचे महत्वपूर्ण योगदान : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी  26 पैकी 24 रूग्णांची कोरोना चाचणी निगेटीव्ह ;  तरीही गाफिल राहू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा

 कोरोना विरूध्दच्या लढाईत सर्व यंत्रणांचे महत्वपूर्ण योगदान : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी 
26 पैकी 24 रूग्णांची कोरोना चाचणी निगेटीव्ह ;  तरीही गाफिल राहू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : सांगली जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधित 26 रूग्णांपैकी 24 रूग्णांचे स्वॅाब निगेटीव्ह आले आहेत. त्यातील 22 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. उर्वरित 2 रूग्णांमधील 1 लहान बालक असून त्याचा पहिला स्वॉब निगेटिव्ह आला आहे. आज त्या बालकाचा दुसरा स्वॉब तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल सायंकाळपर्यंत येणे अपेक्षित आहे. दुसरा स्वॉब निगेटिव्ह आल्यास 26 पैकी 25 रूग्णांना आयसोलेशन कक्षातून डिस्चार्ज देण्यात येईल. डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या लोकांना अधिकची खबरदारी म्हणून इन्स्टीट्यूशनल कॉरंनटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे. उर्वरित रूग्णावर आयसोलेशन कक्षात उपचार सूरू असून प्रकृती स्थिर आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. कोरोना विरोधातील आपण एक लढाई जिंकली असून युध्द अजूनही चालू आहे. आतापर्यंत नागरिकांनी ज्या पध्दतीने सहकार्य केले तसे सहकार्य यापुढेही करावे. आतापर्यंतच्या सर्व वाटचालीत पालकमंत्री जयंत पाटील, सर्व लोकप्रतिनिधी, सर्व शासकीस यंत्रणा प्रसार माध्यमे यांचे योगदान महत्वाचे आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. 
सांगली जिल्ह्यात आढळून आलेले कोरोना बाधित रूग्ण हे इस्लामपूर येथील होते. या परिसरात कोरोना ससंर्ग प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कंटेनमेंन्ट झोन सिल करण्यात आला. तसेच नजीकचे संपर्क बाधित शोधण्यात आले. लोक घराबाहेर पडू नये यासाठी काटेकोर निर्बंध घालण्यात आले. परिसरात मोठ्या प्रमाणावर निर्जंतूकीकरण करण्यात आले व अन्य अनुषांगिक उपाय योजना काटकोरपणे करण्यात आल्या. त्यामुळे पॉझिटीव्ह व्यक्तींना लवकर वेगळे काढून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यामुळे कोरोनाबाधित व्यक्तींची प्रकृती स्थिर राहून बऱ्या होवू शकल्या. असे असले तरी ही केवळ कोरोना विरोधातील आपण एक लढाई जिंकलेली आहे. युध्द अजूनही चालू आहे. आतापर्यंत नागरिकांनी ज्या पध्दतीने सहकार्य केले आहे तसे सहकार्य यापुढेही करावे. सध्याचा काळ पाहता गाफिल राहून चालणार नाही.असेही  जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले.


फिवर क्लिनिक केंद्रे
कारोना संसर्ग प्रतिबंधासाठी प्रशासनसच्यावतीने यापुढेही अनुषांगिक उपाययोजना काटेकोरपणे राबविण्यात येणार आहेत. सर्व प्राथमिक आरोग्य केद्रें, ग्रामीण रूग्णांलये, शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केद्रें या ठिकाणी फिवर क्लिनिक केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये आवश्यकता भासल्यास या ठिकाणी रूग्णांचे स्वॉब घेतले जातील. ताप, सर्दी, खोकला, श्वसनाचे आजार असल्यास नागरिकांनी या ठिकाणी संपर्क साधावा. 


सांगली जिल्ह्याने अशी केली कोरोनावर मात
कारोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने मॉडेल कंन्टेनमेंट प्लान जाहीर केला आहे. त्यानुसार एखाद्या ठिकाणी कोरोना बाधित आढळल्यास त्या ठिकाणी कोणत्या खबरदारीच्या योजना कराव्यात याबद्दल मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्या नुसार जिल्ह्याने मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातच सर्व आराखडा  करून ठेवला होता. इस्लामपूर येथे कोरोना बाधित रूग्ण आढळताच हा आराखडा कार्यरत करण्यात आला. यानुसार तात्काळ प्रतिसाद यंत्रणा कार्यरत करण्यात आली. कारोना बाधितांच्या निकट संपर्कात आलेल्यांची छानणी करून अतिजोखमीच्या व्यक्तींना इन्स्टीट्यूशनल कॉरंटाईनमध्ये ठेवून तात्काळ त्यांचे स्वॉब तपासणीसाठी पाठविण्यात आले व ज्यांना लक्षणे होती व स्वॉब पॉझिटीव्ह आले त्यांना आयसोलेशन वार्डमध्ये ठेवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. ज्या कमी जोखमीच्या व्यक्ती होत्या त्यांना होम क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्यात आले. आरोग्य यंत्रणेमार्फत त्याच्यावर लक्ष ठेवून त्यांची तपासणी करण्यात आली. इस्लामपूर आणि परिसरात सोशल डिस्टन्सिंगबाबत काटेकोर अमंलबजावणी करण्यात आली. एक कि.मी त्रिज्येच्या या कंन्टेनमेंट झोनमध्ये जवळपास 1600 कुटुंबामधील सुमारे 7500 लोकांचे 31 वैद्यकीय पथकामार्फत दररोज 14 दिवस तपासणी करण्यात आली. या कोअर झोनमधील नागरिकांना घराबाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात आले. जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्यात आल्या. प्रत्येक घरात लोकांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबतची माहिती पुस्तिका वाटण्यात आल्या. आरोग्य टीमला कारोना प्रतिबंधासाठी लागणारी आवश्यक साधन सामुग्री पुरवण्यात आली. (उदा. ग्लोज, मास्क ) त्यामुळे या यंत्रणेनेही न बिचकता चांगले काम केले. नगरपालिकेमार्फत निर्जंतूकीकरण मोठ्या प्रमाणावर करण्यात आले. ज्या ठिकाणी कोरोना बाधित व्यक्तीचा संपर्क आला होता अशा ठिकाणी सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात आली. असे मॉडेल कंन्टेनमेंट प्लानची अत्यंत काटेकोर पणे अमंलबजावणी करण्यात आली. कंन्टेनमेंट झोनच्या बाहेरही आणखी एक किलोमीटर परिसराच्या बाहेर बफर झोन तयार करण्यात आला. यामध्ये 16 आरोग्य पथकामार्फत सातत्याने निरिक्षण करण्यात आले. ज्यांना फ्लू सारखी लक्षणे होती त्यांच्या आवश्यक त्या तपासण्या करण्यात आल्या. या सर्व खबरदाऱ्या घेतल्यामुळे अन्य कुटुंबांतील व्यक्तींमध्ये कोरोनाचा प्रसार झाला नाही. आरोग्य, पोलिस, महसूल, महानगरपालिका, नगरपालिका  या सर्व यंत्रणांनी अत्यंत चांगले पध्दतीने काम केल्यामुळे या सर्व यंत्रणा कौतुकास पात्र आहेत. या पुढेही या सर्व यंत्रणांनी असेच समन्वयाने कार्य करणे आवश्यक आहे. तसेच नागरिकांनीही असाच प्रतिसाद द्यावा. वारंवार हात धुवावेत, मास्क वापरणे अनिवार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured