अजनाळे गावात जनता कर्फ्यूला पहिल्या दिवशी १०० टक्के प्रतिसाद 


अजनाळे गावात जनता कर्फ्यूला पहिल्या दिवशी १०० टक्के प्रतिसाद 
माणदेश एक्सप्रेस न्युज
अजनाळे/सचिन धांडोरे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी आज दि २६ एप्रिल  ते २८ एप्रिल  पर्यंत अजनाळे, लिगाडेवाडी ता. सांगोला येथील सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजे अजनाळे येथे अत्यावश्य सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद होते. घेरडीमध्ये मध्ये कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी जनता कर्फ्यू चा निर्णय घेतला आहे. गावातील नागरिकांनी प्रशासनाच्या सहकार्याने व स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्याचा निर्णय दक्षता कमिटी व  ग्रामपंचायत यांच्या वतीने घेण्यात आला आहे.


हे ही वाचा :- डॉ. विश्वजीत कदम यांच्या प्रयत्नास यश ; एप्रिल २०२० मधे पडलेल्या गारपीट व अवेळीच्या पावसाने शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणार


कोणीही विनाकारण फिरकू नये जे विनाकारण गावात फिरताना आढळल्यास त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करुन दंड आकारण्यात येणार असल्याने छाटणी कामगार व शेतमजूर डाळिंब बागेमध्ये काम करताना सापडला तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा गाव कामगार तलाठी किरण बाडीवाले, पोलीस पाटील संतोष भंडगे व ग्रामसेवक शहाजीराव इंगोले यांनी दिला आहे. 


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured