Type Here to Get Search Results !

बारवकर जि.प. शाळेचे मंथन स्पर्धा परीक्षेत यश ; केंद्रात व जिल्ह्यात विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 


बारवकर जि.प. शाळेचे मंथन स्पर्धा परीक्षेत यश ; केंद्रात व जिल्ह्यात विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 
माणदेश एक्स्प्रेस न्यूज 
आटपाडी/प्रतिनिधी : बारवकर जि.प. शाळा ता.आटपाडी, जि. सांगली याने शाळेने मंथन स्पर्धा परीक्षेत यश मिळविले असून केंद्रात व जिल्ह्यात विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. 
सन २०१९/२०  मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय मंथन स्पर्धा परीक्षेत विराज संतराम अजेटराव याने इ. २ री मध्ये करगणी केंद्रात २ रा, जिल्ह्य़ात २१ वा तर राज्यात २३ वा क्रमांक पटकावला. कु. वर्षा शिवाजी सोन्नुर हिने इ. ३ री मध्ये करगणी केंद्रात ३ रा, जिल्ह्य़ात २५ वा तर राज्यात ३० वा क्रमांक पटकावला. तसेच अफ्फान असिफ मुजावर याने इ. ४ थी मध्ये करगणी केंद्रात प्रथम, जिल्ह्य़ात ९ वा तर राज्यात ११ वा क्रमांक पटकावला. याशिवाय सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. पालकांनी निकालाबाबत शाळेचे कौतुक आणि समाधान व्यक्त केले आहे. शाळेचे मुख्याध्यापक असिफ मुजावर, वर्गशिक्षक संतराम अजेटराव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


देशातील, राज्यातील व आपल्या परिसरातील बातम्यासाठी Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies