भालवडी माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे ! ; माण तालुक्यातील पहिली माध्यमिक शाळा

भालवडी माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे ! ; माण तालुक्यातील पहिली माध्यमिक शाळा


भालवडी माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे ! ; माण तालुक्यातील पहिली माध्यमिक शाळा
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला : भालवडी ता. माण, जि. सातारा या माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे  देण्यात येत असून अशी सुविधा राबविणारी माण तालुक्यातील पहिली माध्यमिक शाळा आहे. लॉकडाऊन च्या काळात विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली असून परीक्षा रद्द झाल्या आहेत, परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांनी ऑनलाईन वर्ग सुरू केल्याची माहिती या विद्यालयाचे प्रा. श्रीकांत भागवत यांनी दिली.
 प्रा. श्रीकांत भागवत यांनी सांगितले की लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सातारा जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी विविध माध्यमातून शाळा व मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधून अशा प्रकारचे नियोजन करून प्रत्येक वर्गाला ऑनलाइन शिक्षण देण्याचे सूचित केले आहे. तर ते स्वतः विद्यार्थ्यांना ऑनलाईन पत्राद्वारे मार्गदर्शन करीत आहेत. त्यांच्या आवाहना नुसार भालवडी माध्यमिक विद्यालयात प्रत्येक वर्गाचा व्हाट्सएपच्या माध्यमातून ग्रुप तयार केले असून त्या ग्रुपवर वर्गशिक्षक, विषय शिक्षक, व मुख्याध्यापक,त्या वर्गातील विद्यार्थी व पालक यांचा समावेश करण्यात आला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम विविध उपक्रम पाठवून देत आहेत. ते उपक्रम व अभ्यासक्रम विद्यार्थी व पालक ही पाहत आहेत, विद्यार्थी शंका, शिक्षकांना विचारत आहेत, त्याचे निराकरण केले जात आहे.  अभ्यासक्रम यासह विद्यार्थ्यांना खेळ, योगा,सोशल डिस्टन्सचे महत्व, कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना याचे महत्व पटवून दिले जात आहे.
 या शाळेत तयार करण्यात आलेल्या प्रत्येक वर्गाच्या ग्रुपवर मुख्याध्यापक स्वतः असून दररोज शिक्षक विद्यार्थ्यांना काय उपक्रम देतात व त्याची अंमलबजावणी कशी होते ? कोणते शिक्षक काय काम करतात? याचा आढावा घेणे व पालक, विद्यार्थी यांच्या काय शंका आहेत त्याचा आढावा घेऊन मार्गदर्शन करणे सोपे झाले असल्याचे प्राचार्य भागवत म्हणाले.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments