खरसुंडी मध्ये हातातील कड्याने एकाला मारहाण

खरसुंडी मध्ये हातातील कड्याने एकाला मारहाण


खरसुंडी मध्ये हातातील कड्याने एकाला मारहाण
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : खरसुंडी ता. आटपाडी येथील एकाला हातातील कड्याने मारहाण केल्याची घटना दिनांक ८ रोजी खरसुंडी गावात घडली.
याबाबत सविस्तर हकीकत अशी, खरसुंडी येथील नाथाबाबा लक्ष्मण चव्हाण रा. देडेवस्ती हे खरसुंडी गावात दळण दळून डवरीगल्ली येथील देविदास इंगवले याच्यासोबत बोलत थांबले असताना यातील आरोपी आनंद सुरेश माळवे याने मासे धरण्याच्या जाळीचे पैशाच्या कारणावरून फिर्यादी नाथाबाबा लक्ष्मण चव्हाण याला शिवीगाळ केली व हातातील कड्याने मारहाण करून फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली. म्हणून आटपाडी पोलीस स्टेशन येथे भा.दं.वि.सं. ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना वगरे अधिक तपास करीत आहे.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments