Type Here to Get Search Results !

लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांचे लाईटबिल शासनाने माफ करावे : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले ; 4 महिने थकबाकीमुळे कोणाचाही वीज बंद करू नये 


लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांचे लाईटबिल शासनाने माफ करावे : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले ; 4 महिने थकबाकीमुळे कोणाचाही वीज बंद करू नये 
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : लॉकडाऊनमुळे सर्व  गरिबांचे तीन महिन्यांचे लाईटबील शासनाने माफ करावे; सर्व बिल माफ करता येत नसेल तर किमान 50 टक्के वीजबिलाची रक्कम माफ करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे. 50 टक्के वीजबिल माफ करण्यासाठी  त्यातील अर्धी वीज बिलाची रक्कम म्हणजे 25 टक्के बिल वीज कंपनीने माफ करावे तसेच पुढील 4 महिने  थकबाकीमुळे कोणाचाही विजमिटर कापू नये अशी सूचना ना रामदास आठवले यांनी विजकंपन्यांना केली आहे. 
मुंबई उपनगर येथे अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनी ने 18 टक्के वीजबिल माफ केले आहे. मात्र आणखी वीजबिल माफ करण्याचे आपण त्यांना आवाहन केले असल्याची माहिती रामदास आठवले यांनी केली आहे. मुंबई शहरात वीज पुरवठा बेस्ट करीत असून मुंबई महापालिके ने स्थायी समिती मध्ये याबाबत ठराव करून 3 महिने वीजबिल किमान 50 टक्के माफ करण्यासाठी निर्णय घ्यावा असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.
वीजबिल माफ करण्यासोबत कोरोनाची चाचणी मोफत करावी किंवा अल्प दरात करण्यात यावी .सध्या कोरोना चाचणी साठी 5 हजारापर्यंत दर आकारले जात आहेत. त्या ऐवजी मोफत किंवा  रु.500 एवढ्या अल्पदरात कोरोना चाचणी करावी अशी आपली मागणी असून याबाबत लवकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचे टे म्हणाले. रुग्णालयातील डॉक्टरप्रमाणे नर्स यांनाही कोरोना चे  किट उपलब्ध करून दिले पाहिजे. पुरेशा सुविधा नर्सेसला ही दिल्या पाहिजेत. तसेच खाजगी डॉक्टरांनी दवाखाने बंद करू नयेत. कोरोना ला घाबरुन जर खाजगी डॉक्टर घरी बसले तर कोरोनाशी लढा कसा जिंकणार? असा सवाल क्र्रीत खाजगी डॉक्टरांनी दवाखाने सुरू कारण्याचे आवाहन केले. तसेच रिपब्लिकन कार्यकर्ते विविध ठिकाणी मदत करीत आहेत त्यांनी रक्तदान करण्यासाठी ही पुढे आले पाहिजे असे ते म्हणाले.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies