कोरोनाच्या लढाईत पत्नीचाही सहभाग, पतीच्या सोबत रणरागिणी मैदानात !! 

कोरोनाच्या लढाईत पत्नीचाही सहभाग, पतीच्या सोबत रणरागिणी मैदानात !! 


कोरोनाच्या लढाईत पत्नीचाही सहभाग, पतीच्या सोबत रणरागिणी मैदानात !! 
माणदेश एक्सप्रेस न्युज
निंबवडे/राघव मेटकरी : आज जगभर कोरोना च्या विषाणूची दहशत आहे.  माणूस सगळं सोडून जगायला गावाकडे धावतो आहे. अशातच हा रोग खेड्यापाड्यात डोकावू लागला आहे. म्हणून   आपल्या परीने जो तो मदत करीत आहे. त्यातच ग्रामीण भागामध्ये आपल्या तोंडाला बांधायचा मास्क चा तुटवडा पडायला लागलेला आहे. हे लक्षात येताच निंबवडे गावचे आदर्श शिक्षक नानासाहेब झुरे यांच्या सौभाग्यवती सौ स्वाती नानासाहेब झुरे त्यांनी स्वतः मास्क तयार करून परिसरातील सर्वांना मोफत देण्याचे कार्य चालू केलेले आहे. त्या न्यू माणदेश युथ फाऊंडेशन निंबवडे या महिला विंगच्या सदस्य आहेत. त्याही आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून समाजकारणात सक्रिय झालेल्या आहेत. कारण त्यांनीसुद्धा या संकटातून बाहेर पडण्यासाठी चांगल्या पद्धतीचे प्रबोधनाचं कार्य सुरू केलेले आहे. सर्वांना त्यांनी घरातच बसण्यासाठी सांगितलेला आहे. अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नये तसेच प्रशासनाच्या ज्या ज्या सूचना येतील त्याचे पालन करावी अशी विनंती त्यांनी नागरिकांनी केली आहे.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments