Type Here to Get Search Results !

अजनाळे गावात तीन दिवसाच्या  जनता कर्फ्यूला नागरिकांनी दिली साथ


अजनाळे गावात तीन दिवसाच्या  जनता कर्फ्यूला नागरिकांनी दिली साथ
माणदेश एक्सप्रेस न्युज
 अजनाळे/सचिन धांडोरे : अजनाळे ता. सांगोला  येथे दिनांक 26 एप्रिल ते  28 एप्रिल पर्यंत प्रशासनाच्या  व  नागरिकांच्या सहकार्याने कोरोना साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी तीन दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता, त्याला अजनाळेकरांनी १००  %  प्रतिसाद दिला. 


हे ही वाचा :-  दक्षता कमिटी नावालाच; ग्रामसेवक तलाठी, गावाकडे फिरकेनात; सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागातील परिस्थिती


गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आहे.  कोरोना व्हायरस प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळला होता. सांगोला तालुक्यातील  ग्रामीण भागामध्ये  कोरोना व्हायरस शिरकाव झाल्यामुळे ग्रामीण भागातील जनता चिंताग्रस्त  बनली आहे. प्रशासन व नागरिकांनी समन्वय साधून मुकाबला केला तर त्यावर सहजासहजी मात करता येते, त्यामुळे गावातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला.


जीवाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कमर्चारी यांनी केलेल्या कार्याला सलाम !
तू विठ्ठल, मौला, मेरा, तु आसरा सबकुछ मेरा !



हा जनता कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी गाव कामगार तलाठी किरण बाडीवाले, ग्रामसेवक शहाजीराव इंगोले, पोलीस पाटील संतोष भंडगे, सरपंच अर्जुन कोळवले, कोतवाल नवनाथ इंगोले, आरोग्य सेवक अशोक कलाल यांच्यासह ग्राम सुरक्षा रक्षक दलाच्या सुरक्षारक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies