माळशिरसमध्ये नगरपंचायत, व नगरसेवक डॉ.आप्पासाहेब देशमुख यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर संपन्न


माळशिरसमध्ये नगरपंचायत, व नगरसेवक डॉ.आप्पासाहेब देशमुख यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर संपन्न
माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे : माळशिरस नगरपंचायत, माळशिरस व नगरसेवक डॉ.आप्पासाहेब देशमुख यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक १० मध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे करिता सर्वसाधारण प्राथमिक तपासणी शिबीर घेण्यात आले. यावेळी सामाजिक नियमांचे पालन करीत दहा वर्षापासून पुढे अशी सर्वांची एकूण ५९३ लोकांनी आपली तपासणी करुन घेतली. कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले जाणारे माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब यांनी माळशिरस तालुक्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून होम टू होम तपासणी मोहीम राबवली आहे.


हे ही वाचा :- दिवसभर कर्तव्य करून पोलीस पाटलांच्या काठीला विसावा..........


यावेळी नगरपंचायत माळशिरसचे मुख्याधिकारी डॉ.विश्वनाथ वडजे, डॉ.नितीन सिद, डॉ.आप्पासाहेब देशमुख, डी.के.पाटील, विकास पवार, सुनील मदने, रावसाहेब देशमुख, श्रीनाथ विद्यालयाचे प्राचार्य योगेश गुजरे, गणेश कुलकर्णी, नर्स, अंगणवाडी सेविका, नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured