Type Here to Get Search Results !

विद्यापीठ अंतर्गत ऑनलाईन पदवी परीक्षा रद्द करण्यात यावी ; विठ्ठल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी 


विद्यापीठ अंतर्गत ऑनलाईन पदवी परीक्षा रद्द करण्यात यावी ; विठ्ठल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी 
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला : ऑनलाईनला पदवी परीक्षा घेण्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपुढे अनेक अडचणी आहेत. कोरोनामुळे विद्यापीठ अंतर्गत ऑनलाईनला पदवी परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी विठ्ठल बहुउद्देशीय सेवा भावी संस्था तडवळे ता खटाव यांनी उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचेकडे मेलव्दारे केली आहे. 
प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या विद्यापीठ अंतर्गत पदवी परीक्षा ऑनलाईन घेण्याचे विचाराधीन आहे. मात्र बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत आणि ग्रामीण भागात सध्या तरी नेटवर्क सुविधा सुरळीत चालत नाही तसेच शहरी भागात शिक्षण घेणारे विद्यार्थी लोंकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे अचानक गावाला आले आहेत. अचानक गावाकडे यावे लागल्याने अभ्यासाची पुस्तके खोलीवर अडकून पडली आहेत. शिवाय गावाकडे सध्या दुकाने बंद असल्याने नवीन पुस्तके उपलब्ध होत नाहीत.


हे ही वाचा :-  माणदेशातील ज्येष्ठ साहित्यिक, 'झुलवा'कार उत्तम बंडू तुपे यांचे निधन


त्याचबरोबर पदवी परीक्षा एमसीक्यू पध्दतीने घेण्यात येऊ नये कारण या परीक्षा पद्धतीत सुक्ष्म पध्दतीने अभ्यास करावा लागतो आणि सध्या असा अभ्यास करण्यासाठी पुस्तके उपलब्ध नाहीत तसेच पदवी परीक्षेसाठी ही पध्दत अभिप्रेत नसून शासनाने स्वाध्याय पध्दतीचा अवलंब करावा अशीही मागणी करण्यात आली आहे. तसेच सध्या झुम ॲपद्वारे ऑनलाईनला वर्ग घेतले जातात त्यातून वैयक्तिक माहिती चोरीला गेलेचे उघडकीस आले आहे. तसेच शहरी भागातील काही विभाग रेड झोनमध्ये असल्याने पालक यांच्यात भीतीचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिक तयारी नाही. कोरोनामुळे शासन जी परीक्षा पध्दती अवलंबणार आहे त्याची किमान पंधरा दिवस माहिती विद्यार्थ्यांना देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies