Type Here to Get Search Results !

माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फळबागा व पिकांचे पंचनामे करुन एकरी 50 हजार रुपये अर्थसहाय्य द्या :  अजय सकट  ; तालुक्यातील विविध प्रश्नाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन


माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फळबागा व पिकांचे पंचनामे करुन एकरी 50 हजार रुपये अर्थसहाय्य द्या :  अजय सकट 
तालुक्यातील विविध प्रश्नाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन
माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे : माळशिरस तालुल्यातील शेतकर्यांपच्या फळबागा व पिकांचे पंचनामे करुन त्यांना एकरी 50 हजार रुपये अर्थसहाय्य द्या अशा मागणीचे निवेदन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून तालुक्याचे नेते उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती सदस्य अजय सकट यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री  यांना ई-मेल द्वारे पाठविले आहे. 
तालुक्यातील शेतकर्यांरना अवकाळी पावसामुळे मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. तसेच कोरोनामुळे अनेक फळबागा (केळी, द्राक्ष, डाळींब, कलींगड, खरबूज) तसेच अनेक पिकांचेही फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तरी शेतकर्यांीना फळबागा व पिकांचे पंचनामे करुन शेतकर्यांसना एकरी 50 हजार रुपये अनुदान किंवा अर्थसहाय्य द्यावे, शेतकर्यांीना 24 तास वीजपुरवठा द्या. सध्या होणारे भारनियमन बंद करावे, नाभिक व्यवसायाची दुकाने बंद असल्याने त्यांची उपासमार होत आहे. त्यांना दाढी, कटींग करण्यासाठी सकाळी 2 तास वेळ दुकाने उघडी ठेवण्यासाठी द्यावा, बांधकाम कामगार व मजूर यांना ५ हजार रुपयांची मदत करावी, राज्यातील गटसचिवांना समान वेतन द्यावे व त्यांना शासनाकडे वर्ग करुन घ्यावे. त्याचप्रमाणे राज्य व केंद्रसरकारने शेतकर्यां ना कर्जमाफी केली असल्याने 50% पीक कर्जवसुली होत नाही. त्यामुळे तीही अट शिथील करावी, ज्या नागरिकांना रेशनकार्ड नाही, परंतु आधारकार्ड आहे. अशांना आधारकार्डवर रेशनचा शिधा मिळण्याची व्यवस्था करावी, कोरोना या महामारीच्या पार्श्वनभूमीवर काम करीत असलेला आरोग्य विभाग, पोलीस, ग्रामसेवक, तलाठी कृषी सहाय्यक, अंगणवाडी सेविका अशांना शासनाकडून विमा सरंक्षण मिळावे, तालुक्यातील खाजगी हॉस्पीटल मधील डॉक्टर व कर्मचार्यां ना १ कोटीपर्यंतचा विमा शासनाकडून मिळावा, कामगार, शेतमजूर,  दारिद्र्यरेषेखाली असणार्या  कुटुंबाना 3 हजार रुपये मदत मिळावी, तालुक्यातील फळे व भाजीपाला विक्री करण्यासाठी बाजारपेठेत नेण्यासाठी शेतकर्याीची अडवणूक होऊ नये यासाठी त्यांना जलदगतीने पास उपलब्ध व्हावेत, दिव्यांग, अपंगांना जीवनावश्यक वस्तू व धान्य तसेच त्यांना २ हजारांची आर्थिक मदत करावी तसेच पत्रकार जोखीम घेऊन काम करीत आहेत तरी शासनाने त्यांना विमा सरंक्षण अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. 
या निवेदनावर जि.प. सदस्य बाळासाहेब धाइंजे, रमेशभाऊ पाटील, आंबेडकर चळवळीचे नेते विकास धाइंजे, राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने,राहुल सावंत, शंकरराव काळे-पाटील, किरण साठे, तुकाराम ठवरे, नगरसेवक मारुती देशमुख यांची स्वाक्षऱ्या आहेत. हे निवेदन प्रांताधिकारी शमा पवार व तहसीलदार अभिजीत पाटील यांना देण्यात आले. 


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies