वसुंधरा पर्यावरण संस्था करणार मास्क वितरण ; पहिल्या टप्प्यात खानापूर तालुक्यात होणार 500 मास्कचे वाटप

वसुंधरा पर्यावरण संस्था करणार मास्क वितरण ; पहिल्या टप्प्यात खानापूर तालुक्यात होणार 500 मास्कचे वाटप


वसुंधरा पर्यावरण संस्था करणार मास्क वितरण ; पहिल्या टप्प्यात खानापूर तालुक्यात होणार 500 मास्कचे वाटप
माणदेश एक्सप्रेस न्युज
विटा :  संपूर्ण देशासह महाराष्ट्रात कोविड 19 कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाला रोखण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. या अनुषंगाने सामाजिक जाणिवेतून समाजपयोगी उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या वसुंधरा पर्यावरण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था खानापूर ने पुढाकार घेत खानापूर तालुक्यात पहिल्या टप्प्यात 500 मास्क वितरण करण्याचा महत्त्वकांक्षी उपक्रम जाहीर केला आहे.
खानापूर तालुक्यातील शेतकरी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, आदींना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मास्क देण्यात येत आहेत. कोरोना विषाणू विरुध्द सुरु असलेल्या लढ्यात वसुंधरा संस्थेच्यावतीने विटा शहरात जनजागृतीचे विशेष काम नित्य सुरु आहे. त्याच अनुशंगाने तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये संस्थेच्यावतीने लोकांना मास्क देण्याचा कृती कार्यक्रम तयार केला आहे. पहिल्या टप्प्यात 500 मास्क ची व्यवस्था करण्यात आली आहे. लोकांनी मास्कसाठी मेडीकल मध्ये गर्दी करु नये आम्ही संस्थेच्यावतीने घरपोहच मोफत मास्क  देत आहोत. घरीच रहा तसेच सोशल डिस्टस्टींगचे पालन करा असे आवाहन संस्था अध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांनी केले आहे. "कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकचे सहाय्य करण्यासाठी वसुंधरा संस्था घेणार पुढाकार" 
कोरोना विषाणू संसर्ग पार्श्वभूमीवर  वसुंधरा पर्यावरण संस्था जनजागृतीसह लोकांना मदतीसाठी पुढाकार घेत आहे. यासाठी शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करु व कोरोनाला हद्दपार करु. या संकटात संस्थास्तरावर आम्ही जास्तीतजास्त लोकांना सहाय्य करण्याचा प्रयत्न करत आहोत आपण ही सहभाग घेऊन या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करु. मोफत मास्कसाठी दत्तात्रय शिंदे 8605109355, डॉ. वैशाली हजारे 9423809256 नानासाहेब मंडलिक 9850532140, नितीन चंदनशिवे 9860609973, गणेश धेंडे 8600320547 असलम शेख 9156625328, भगवान जाधव 7588866407, विजयकुमार ठिगळे 8484016176 या क्रमांकावर संपर्क साधावा. अशी माहिती वसुंधरा संस्थेचे सचिव नितीन चंदनशिवे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments