रिक्षा चालकांना 5000 हजारांची  मदत करा : आमदार विनोद निकोले ; परिवहन मंत्री अनिल परब यांच्या कडे मागणी

रिक्षा चालकांना 5000 हजारांची  मदत करा : आमदार विनोद निकोले ; परिवहन मंत्री अनिल परब यांच्या कडे मागणी


रिक्षा चालकांना 5000 हजारांची  मदत करा : आमदार विनोद निकोले ; परिवहन मंत्री अनिल परब यांच्या कडे मागणी
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई / डहाणू. (विशेष प्रतिनिधी) : राज्यातील रिक्षा चालकांना 5000/- मदत करावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या कडे ईमेल द्वारे केली आहे.
यावेळी आमदार निकोले म्हणाले की, डहाणू विधानसभा मतदार संघातील डहाणू व तलासरी मधील विविध रिक्षा चालक, मालक यांनी मला संपर्क करून मदतीची मागणी केली आहे. मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्र शासन परिवहन विभागाकडून मोटार वाहन विभाग तर्फे रिक्षा परमिट देण्यात आले हे परमिट अधिकतर सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी बँका, सोसायटी, पतपेढी, पत संस्था आदींकडून कर्ज घेऊन रिक्षा घेतल्या. जेणेकरून रिक्षा चालवून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येईल. पण, त्यात वाढवलेले पेट्रोल दर, CNG गॅस दर तसेच रिक्षा चा देखभालीचा खर्च (मेंटनस ऑईल बदली, ग्रीसिंग आदी) मध्ये मिळालेले उत्पन्न खर्च होते. त्यात कोरोना च्या पाश्वभूमीवर लॉकडाऊन च्या परिस्थितीत सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्षा चालकांवर मोठे संकट ओढवले आहे. रिक्षा चालकांनी संसार चालवायचा की, बँकांचे हफ्ते 4000 ते 5000 पर्यंत असतात ते भरावे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने इतर राज्यात प्रमाणे रिक्षा चालकांना आपल्या राज्यात किमान 5000/- मदत होणे आवश्यक असून लॉकडाऊन च्या काळात रिक्षा चालकांना मदत करावी. 


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments