आटपाडीत संचारबंदी व लॉकडाऊनला उन्हाची साथ ; शहरातील प्रमुख चौकातील रस्ते झाले निर्मनुष्य ; उन्हाच्या तीव्रता लोकांचे फिरणे झाले कमी

आटपाडीत संचारबंदी व लॉकडाऊनला उन्हाची साथ ; शहरातील प्रमुख चौकातील रस्ते झाले निर्मनुष्य ; उन्हाच्या तीव्रता लोकांचे फिरणे झाले कमी


आटपाडीत संचारबंदी व लॉकडाऊनला उन्हाची साथ
शहरातील प्रमुख चौकातील रस्ते झाले निर्मनुष्य ; उन्हाच्या तीव्रता लोकांचे फिरणे झाले कमी
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/बिपीन देशपांडे : तापलेले रखरखते ऊन, शहरातील प्रमुख चौकात निर्मनुष्य झालेले रस्ते, उन्हाचा वाढता तडाखा, सगळीकडे शुकशुकाट, विनाकारण फिरणारे युवक, नागरिक यांनी उन्हाच्या तडाख्याने घराबाहेर पडणे बंद केल्याचे दिसत आहे. त्यामुळे पोलिसांना थोडा का वेळ का होईना क्षणभर विश्रांती मिळत आहे. कोरोना चे इस्लामपूर मधील रुग्णांचे आलेल्या निगेटिव्ह रिपोर्टने जिल्ह्याला आशादायक चित्र असले, तरी पुण्या-मुंबई मध्ये वाढलेले रूग्णामुळे सर्वांना चिंता करावी लागणार आहे. अत्यावश्यक कामानिमित्त बाहेर पडू नये असे वारंवार आवाहन करूनही आटपाडी शहरातील प्रमुख चौकात युवक गर्दी करत असल्याचे चित्र असले तरी इतरवेळी प्रशासनाच्या विनंतीला फाटा देणार देणारे पोलीस गाडी दिसताच गल्लीबोळात सुसाट धावताना दिसत आहेत तसेच वाढत्या उन्हाच्या तडाख्याने उन्हालाही ते घाबरता ना दिसत आहे. उन्हाच्या तीव्रता जसजशी वाढत आहे तसे लोकांनी रस्त्यावर फिरणे कमी केल्याची दिसत आहे. त्यामुळे लॉकडाऊन व संचारबंदी ला उन्हाची साथ मिळत आहे.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments