मी मूर्ख नाही, मी मेणबत्ती पेटवणार नाही ; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका ;  भयग्रस्त जनतेला आधार पाहिजे अंधकार नाही 

मी मूर्ख नाही, मी मेणबत्ती पेटवणार नाही ; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका ;  भयग्रस्त जनतेला आधार पाहिजे अंधकार नाही 


मी मूर्ख नाही, मी मेणबत्ती पेटवणार नाही
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका ;  भयग्रस्त जनतेला आधार पाहिजे अंधकार नाही 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी मेणबत्ती लावण्याच्या आवाहनावर टिका केली असून ''मी मुर्ख नाही. मी 'त्या' दिवशी एकही मेणबत्ती पेटवणार नाही. मी माझ्या घरातले दिवे बंद करणार नाही,'' असे टे म्हणाले.
रविवारी ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटे घरातले दिवे बंद करुन मेणबत्ती, तेलाचे दिवे किंवा मोबाईलची फ्लश लाईट लावा, असे आवाहन मोदीं यांनी आज सकाळी व्हीडोह्या माध्यमातून केले. त्यावर बोलताना मंत्री आव्हाड म्हणाले, "देशाला आशा होती की मोदी साहेब जीवनावश्यक वस्तूंबाबत बोलतील. भारतातील कुठलाही नागरिक उपाशी झोपणार नाही, याबद्दल बोलतील. सॅनिटायझर व औषधं, मास्क याची उपलब्धतता मुबलक प्रमाणात असेल व कुणालाही औषधं कमी पडणार नाही, यावर बोलतील. आम्ही एक नवीन लस शोधून काढतोय यावर बोलतील. टेस्टिंग कीट कमी पडणार नाहीत यावर बोलतील. कोरोनामुळे भयग्रस्त झालेल्या जनतेला आधार देतील, असं वाटलं होतं,'' 
प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करावासा यांना का वाटतो? असा सवाल करुन ते म्हणाले, ''त्यांनी नवीनच फंडा काढला. म्हणाले अंधार करा आणि लाईट पेटवा. लोकांच्या जीवनात अंधार पसरलेला असताना पंतप्रधानांनी त्यांच्या जीवनात उजेड आणण्याची आवश्यकता असताना अशावेळी ते म्हणतात मोबाईलचे लाईट पेटवा. हा तद्दन मुर्खपणा आहे. नादान बालीशपणा आहे. मी काम करतोय. मी गरीबांमध्ये जातोय. मी गरीबांना जेवण देतोय. ते तेल आणि मेणबत्तीचे पैसेही मी गरीबांना देईन. मी माझ्या घरातले लाईट सुरु ठेवणार व एकही मेणबत्ती पेटवणार नाही. असे त्यांनी ठणकावून सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलेल्या आवाहनावर टीका केली.


 


मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा


 


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments