Type Here to Get Search Results !

लेंगरे गावात चुकीच्या गोष्टीचे समर्थन कदापि होणार नाही : सरपंच राधिका बागल ;  पोलीस पाटील पुष्पा बोबडे यांच्यावर झालेल्या अन्यायाचा जाहीर निषेध : दोषीं प्रकाश बागल व अन्य लोकांवर कडक कारवाईची मागणी


लेंगरे गावात चुकीच्या गोष्टीचे समर्थन कदापी होणार नाही : सरपंच राधिका बागल ;  पोलीस पाटील पुष्पा बोबडे यांच्यावर झालेल्या अन्यायाचा जाहीर निषेध : दोषीं प्रकाश बागल व अन्य लोकांवर कडक कारवाईची मागणी
माणदेश एक्सप्रेस न्युज 
लेंगरे : लेंगरे ता. खानापूर, जि. सांगली येथील अभ्यासू महिला पोलीस पाटील पुष्पा बोबडे यांनी आपले कर्तव्य पार पाडत असताना त्यांना अर्वाच्छ भाषेत शिवागाळ व मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. लेंगरे गावात असा प्रकार घडणे ही निंदनीय बाब आहे. लेंगरे गावाचे प्रतिनिधित्व महिला करत आहेत सरपंच, उपसरपंच यांचेसह दहा महिला सदस्या यांचेसह पोलीस पाटील या पदावर महिला सक्षमपणे नेतृत्व करत आहेत. यावेळी धाडसी व निडरपणे काम करणाऱ्या पोलीस पाटील पुष्पा बोबडे यांच्यावर झालेल्या अन्यायाचे समर्थन लेंगरे गाव कधीच करणार नाही. अन्यायावर प्रतिकार करणे हे गावचे संस्कार आहेत. सुसंस्कृत गावात असा प्रकार घडणे ही खेदाची बाब आहे परंतु लेंगरे गाव हे सत्याच्या बाजूने उभा आहे. पोलीस प्रशासनाने निपक्षपातीपने या प्रकाराचा छडा लावून दोषींवर कठोर कारवाई करावी. अशी संतप्त भुमिका गावातील महिलांनी घेतली आहे.


जीवाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कमर्चारी यांनी केलेल्या कार्याला सलाम !
तू विठ्ठल, मौला, मेरा, तु आसरा सबकुछ मेरा !




पुष्पा बोबडे यांनी घरगुती अडचणीतून ही आपल्या कर्तव्याला प्राधान्य देऊन चांगले काम करत आहेत. देशावर कोरोनाचे संकट आहे. देश पूर्ण लॉकडाऊन आहे. संचारबंदीत नियमानुसार सहकार्य करा. असे आवाहन करुन कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलीस पाटील यांना शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या प्रकाश बागल व अन्य यांचेवर तात्काळ कारवाई करावी. महिलांना अपमानास्पद वागणूक मिळत असेल तसेच त्यांच्यावर अन्याय होत असेल तर यावर कसल्याही प्रकारचे समर्थन होणार नाही. सरपंच राधिका बागल, उपसरपंच राणी कांडेसर, ग्रामपंचायत सदस्या छाया सावंत, संगिता शिंदे, राणी आयवळे, शितल लांब, कलावती गुजले, शुभांगी काळे आदींनी पोलीस पाटील पुष्पा बोबडे यांची भेट घेऊन सदर प्रकाराची माहिती घेतली. या प्रकरणी ग्रामपंचायत लेंगरे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्या, सदस्य, गावातील महिला मंडळे, बचत गट आणि महिला पदाधिकारी यांचेसह विविध स्तरातून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies