गावासाठी लढणारांना सामाजिक बांधिलकी मानून बळ देऊया : सरपंच बागल ; कोरोना पार्श्वभूमीवर लेंगरेत नवाज मणेर यांच्याकडून एन 95 मास्क वाटप


गावासाठी लढणारांना सामाजिक बांधिलकी मानून बळ देऊया : सरपंच बागल ; कोरोना पार्श्वभूमीवर लेंगरेत नवाज मणेर यांच्याकडून एन 95 मास्क वाटप
माणदेश एक्सप्रेस न्युज
विटा :  कोरोना विषाणू हा मानव जातीचा शत्रू आहे. त्याविरोधात अनेकजण आपल्या जीवाची पर्वा न करता लढत आहेत. अशा लढणाऱ्या लोकांना सुरक्षेची किमान साधने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. समाजात काम करणाऱ्या दानशूर लोकांनी यासाठी पुढे आले पाहिजे, असे मत सरपंच राधिकाताई दिलीपराव बागल यांनी व्यक्त केले. लेंगरे येथे पोलीस मित्र नवाज मणेर यांनी आई-वडीलांच्या स्मृती जपत गावात कोरोनाच्या लढाईत सहभागी आरोग्य सेवक, आशा वर्कर्स, डॉक्टर यांच्यासाठी सुरक्षित मानले जाणाऱ्या एन 95 मास्कचे वाटप केले. यावेळी मणेर यांनी सरपंच राधिकाताई बागल यांच्याकडे मास्क सुपूर्द केले.
सरपंच बागल म्हणाल्या, वाढत्या कोरोना विषाणूचा पादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, पोलीस प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांच्या सुरक्षिततेसाठी यांचे काम अविरत सुरु आहे. या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी नवाज मणेर यांनी पुढाकार घेऊन मास्क वितरण केले. ग्रामपंचायत लेंगरे गावात अधिकाधिक काळजी घेत आहे. अनेक लोक पुढे येत आहेत. संकटावर मात करण्यासाठी सर्वजण वैयक्तिक हेवेदावे बाजुला ठेऊन आपापल्या परीने काम करीत आहेत, ही समाधानाची बाब आहे. 
सध्याचे संकट मानवतेवर आले आहे. अशावेळी सर्वांनी एकजुटीने याविरुद्ध उभा राहावे. या संकटावर मात करणाऱ्यांना आपण अल्पशी मदत करु शकलो, हीच खरी आई वडीलांना श्रध्दांजली आहे, अशी भावना नवाज मणेर यांनी व्यक्त केली. कोरोना विरुध्द लढा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता म्हणून देण्यात आलेले मास्क उपलब्ध करून देण्यासाठी फार्मसी कौन्सिल अध्यक्ष विजय पाटील, फैय्याज शेख यांनी महत्वपूर्ण सहकार्य केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या शितल लांब, ग्रामसेवक वसंत माळी, हर्षवर्धन बागल, राष्ट्रवादी कॉग्रेस तालुका उपाध्यक्ष नानासाहेब मंडलिक, पोलिसमित्र मन्सूर शेख, मनिषा आंदळकर, नितीन चंदनशिवे आदी उपस्थित होते.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured