सदाशिवनगर गावात येणारे रस्ते बंद तर मोकाट फिरणाऱ्यावर कायदेशीर कारवाई ; गावकृती समितीची बैठक संपन्न
माणदेश एक्सप्रेस न्युज
सदशिवनगर : कोरोना आजाराचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी त्यावर उपाय योजणा तयार करण्यासाठी आज डी. २३ रोजी सदाशिवनगर मध्ये कृती समितीचे अध्यक्ष गाव कामगार तलाठी शरद खांडेकर यांच्या अध्यक्षेखाली बैठक पार पडली. कृती समितीचे सचिव प्रंशात रूपनवर यांनी ही कमिटीच्या वतीने गावामध्ये काय-काय योजना राबवायच्या तसेच गावात रेशन दुकानाच्या अडचणी व लोकांपर्यत रेशन पोहोचले का नाही यांचा आढावा घेण्यात आला. आरोग्य विभागाच्या अडचणी समजुन घेण्यात आल्या. गावात येणारे रस्ते ही बंद करण्याचा निर्णय कृती समिती मार्फत घेण्यात आला व विनाकारण गावात मोकाट फिरणाऱ्या वर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी असे सर्वानुमते ठरले.
सदरची मिंटीग पुर्ण सोशल डिस्टसचा नियम पाळुन घेण्यात आली. यावेळी कृषी सहाय्यक, आरोग्य कर्मचारी, सरपंच, पोलिस पाटील, कोतवाल, आशा वर्कर, महिला बचत गट सदस्या, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज