शिरतावचे रघुनाथ कोरडे यांची मुख्यमंत्री सहाय्य निधीला ३ लाख ५१ हजारांची मदत 


शिरतावचे रघुनाथ कोरडे यांची मुख्यमंत्री सहाय्य निधीला ३ लाख ५१ हजारांची मदत 
माणदेश एक्सप्रेस न्युज
देवापूर/ डॉ. सागर सावंत : माण-खटाव तालुक्यातील शिरताव गावचे सुपुत्र व देवापूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील शाळेचे विद्यार्थी  रघुनाथ कोरडे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड१९ करीता ३,५१,०००/- रुपयांचा निधी साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्याकडे दिले 
त्यांनी आपल्या यां कार्याने समाजासमोर एक् आदर्श निर्माण केला आहे. काही दिवसापासून महाराष्ट्रासह सपूर्ण देशामध्ये कोरोनाच्या विषाणूने थैमान घातल्याने संपूर्ण देशामध्ये संचारबंदी व लॉकडाऊन केल्याने सर्व सामान्य जनतेचे आर्थिक व्यवहार ठप्प झालेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला व सरकारला अनंत आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. सरकारला सामान्य जनतेच्या विविध समस्यां सोडवण्यासाठी व  औषध उपचार  करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असते याची जाणीव  ठेऊन रघुनाथ कोरडे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे निधी दिला. 


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured