कडेगाव तालुक्यात पणत्या, फटाक्यांची आतषबाजी ; पंतप्रधानांच्या आवाहनाचा इव्हेंट

कडेगाव तालुक्यात पणत्या, फटाक्यांची आतषबाजी ; पंतप्रधानांच्या आवाहनाचा इव्हेंट


कडेगाव तालुक्यात पणत्या, फटाक्यांची आतषबाजी
पंतप्रधानांच्या आवाहनाचा इव्हेंट
माणदेश एक्सप्रेस न्युज
कडेगाव/कुलभूषण महाजन : कडेगाव तालुक्यातील सर्वच गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या दिवे बंद करण्याच्या आव्हानाला कडेगाव शहरासह तालुक्यातील संपुर्ण जनतेने प्रतिसाद दिला. लोकांनी आप आपल्या घरासमोर, गच्चीवर, टेरेस वर त्यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत अनेकांनी गो कोरोना च्या घोषणा दिल्या. त्यामुळे दिवे लावण्याचा, फटाके फोडण्याचा उत्साह दिवाळीचाच सोहळा ठरला. त्याच वेळी कोरोना च्या निमित्ताने  इव्हेंट साजरा झाल्याने गंमतीचाच प्रकार चर्चेत आला.
कोरोना मुळे देशात आणि जगात खळबळ वाढली आहे. त्याला नियंत्रनात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचवेळी पंतप्रधानांनी रविवारी रात्री 9 वाजता सर्व दिवे बंद करून पणती, मेणबत्ती, फ्लॅश लाईट लावण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देताना कडेगाव शहर आणि तालुक्यातील सर्व लोकांनी स्वयंमस्फुर्तीने लाईट बंद करून पणत्या पेटविल्या. उत्साही लोकांनी मात्र जणू कोरोना गायब झाल्याचा आनंद म्हणून फटाके वाजविले. कडेगाव तालुक्यात  मध्ये फटाक्यांची ही आतषबाजी रात्री साडेनऊ वाजल्या नंतरही सुरूच होती. त्यामुळे नेमके काय केले जात आहे, याचे भान उत्साही लोकांना राहिले नाही. अनेकांनी तर गो कोरोना अशा घोषणा दिल्या. सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी आपल्या राहत्या घरी सहकुटुंब पंतप्रधान यांनी केलेल्या आव्हानास प्रतिसाद देवून एकीची भावना निर्माण केली.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


 


Post a comment

0 Comments