Type Here to Get Search Results !

विटा शहरातील दिव्यांग लाभार्थ्यांना थेट घरपोहच अनुदान ; कोरोना संकटात विटा नगरपरिषदेचा महत्त्वपूर्ण उपक्रम 


विटा शहरातील दिव्यांग लाभार्थ्यांना थेट घरपोहच अनुदान ; कोरोना संकटात विटा नगरपरिषदेचा महत्त्वपूर्ण उपक्रम 
माणदेश एक्स्प्रेस न्यूज
विटा/प्रतिनिधी : कोविड 19 कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. या संकटकालीन परिस्थितीत दिव्यांग बांधवांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींना सामोरो जावे लागत आहे. अशा परिस्थिती दिव्यांगाना दिलासा दिला विटा नगरपरिषदेने. शहरातील 267 दिव्यांगाना आर्थिक अनुदान देण्याचे नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यांनी जाहीर केले आणि तदनंतर पालिका प्रशासनाने तत्काळ या निर्णयावर कृतीकार्यक्रम तयार करुन दिव्यांगांना लाभांश देण्यास सुरुवात केली.
अडचणीच्या काळात दिव्यांग बांधवांच्या पाठीशी ठाम : ॲड वैभव पाटील
लॉक डाऊन च्या काळात दिव्यांग बांधवांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असलेने दिव्यांग कल्याण व पुनवर्सन ठोस कृती कार्यक्रमतंर्गत नगरपरिषदेच्या वतीने अनुदान वाटप करण्यात येत आहे, यात लक्षणीय बाब अशी की नगरपरिषदेकडून देण्यात येणारे अनुदान थेट लाभार्थ्यांना घरपोच देण्यात येत असून नगरपरिषद व पोस्ट ऑफिस विटा यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबविण्यात येत आहे.


हे ही वाचा :- विद्यापीठ अंतर्गत ऑनलाईन पदवी परीक्षा रद्द करण्यात यावी ; विठ्ठल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी


एकूण 267 लाभार्थ्यांना विटा नगरपरिषद मार्फत पहिल्या टप्प्यात प्रति लाभार्थी रु 2500 प्रमाणे रु 6,67,500 अनुदान वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तरी दिव्यांग बांधवांनी स्वतःची काळजी घ्यावी. आपल्या अडचणींसाठी नगरपरिषद व आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत असे प्रतिपादन ॲड वैभव पाटील यांनी व्यक्त केले.
दिव्यांग लाभार्थ्यांना घरपोहच थेट अनुदान
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदी लागू आहे या काळात दिव्यांगासाठी दिलासा म्हणून नगरपरिषदेने थेट अनुदान घरपोहच देण्याची व्यवस्था केली आहे. सर्व दिव्यांगांना हा लाभांश घरपोहच करण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांची टीम वॉर्डनिहाय तयार करण्यात आली आहे. दिव्यांग बांधवांनी या संकटाला धैर्याने सामोरे जाण्यासाठी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यांनी केले.
विटा नगरपरिषदेने सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना थेट अनुदान घरपोहच करण्याची सक्षम यंत्रणा तयार केली असून 6,67,500 इतकी एकूण थेट अनुदान रक्कम घरपोहच वितरित करण्यात येत आहे.  दिव्यांग बांधवांसह सर्व विटेकर नागरिकांनी आपल्यासह परिवाराची काळजी घ्यावी. मास्क, सँनेटायझर चा वापर करावा आणि घरी राहून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी दिली. मा.नगराध्यक्ष ॲड वैभव पाटील, नगराध्यक्षा प्रतिभा पाटील,  उपनगराध्यक्ष अजित गायकवाड, आरोग्य सभापती फिरोज तांबोळी, मुख्याधिकारी अतुल पाटील यांचेसह सर्व पदाधिकारी व नपा कर्मचारी आणि सर्व शहरवासीय शहर सुरक्षिततेच्या दृष्टीने युध्दपातळीवर कोरोना विषाणू विरुध्द कामकाज करत आहेत.


देशातील, राज्यातील व आपल्या परिसरातील बातम्यासाठी Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies