तळेवाडीत युवा नेते सुधीरबापू म्हारगुडे यांच्याकडून गरजूंना किराणा आणि धान्य वाटप

तळेवाडीत युवा नेते सुधीरबापू म्हारगुडे यांच्याकडून गरजूंना किराणा आणि धान्य वाटप


तळेवाडीत युवा नेते सुधीरबापू म्हारगुडे यांच्याकडून गरजूंना किराणा आणि धान्य वाटप
माणदेश एक्सप्रेस न्युज
करगणी : निवडणूकांच्या दिवसात मतांचा जोगवा मागायला येणारा खानापूर मतदार संघातील कोणताच जनसेवक, लोकनेते,गरीबांचे कैवारी नावाचा नेता आला नाही पण आज तळेवाडी गावात कोरोना च्या पार्श्वभूमीवर लोकजाणिवेतून सामाजिक बांधिलकी जपत गरजू व्यक्तींच्या चुली पेटत्या राहाव्या यासाठी किराणा मालाचे किट आणि धान्यवाटप करण्यासाठी तळेवाडीचे सुपुत्र युवा नेते सुधीरबापू म्हारगुडे धाऊन आले. गावच्या मातीसाठी मदतीचा एक हात आधार असल्याचे मत गरजुंनी यावेळी व्यक्त केले.
लॉकडाऊनमुळे रोजंदारी करणाऱ्या हातावरचे पोट असणाऱ्या कुटूंबांवरती उपासमारीची वेळ आली असून त्यांना मदत करणे ही माझी सामाजिक जबाबदारी बांधिलकी असल्याचे मत यावेळेस युवा नेते सुधीरबापू म्हारगुडे यांनी व्यक्त केले. कोरोनाला हरविणे शक्य आहे. विनाकारण कुणीही घराबाहेर पडू नका. मास्क वापरा. आपली काळजी आपण स्वत: घेऊया असेही ते म्हणाले. यावेळेस तळेवाडीचे सरपंच,सोसायटीचे माजी चेअरमन ग्रामस्थ उपस्थित होते.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments