Type Here to Get Search Results !

बांधकाम कामगारांच्या खात्यावर (DBT) व्दारे दोन हजार रूपयांचा थेट लाभ : सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव ; बांधकाम कामगारांनी दलालांच्या अथवा एंजटाच्या भूलथापांना बळी पडू नये


बांधकाम कामगारांच्या खात्यावर (DBT) व्दारे दोन हजार रूपयांचा थेट लाभ : सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव ; बांधकाम कामगारांनी दलालांच्या अथवा एंजटाच्या भूलथापांना बळी पडू नये
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली :  देशात 3 मे पर्यंत टाळेबंदी आहे .संबधित नोंदणीकृत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रूपयांचा थेट लाभ हस्तांतरण (DBT) व्दारे रास्त कामगारांच्या खात्यावर महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई येथून करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील काही दलाल घरोघरी जावून बांधकाम कामगारांना तुमचे पैसे येणार असून यासाठी काही ठराविक रक्कम द्या व तुमचे कागदपत्रे द्या असे सांगून फसविण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बांधकाम कामगारांनी दलालांच्या अथवा एंजटाच्या भूलथापांना बळी पडू नये. तसेच अशा पध्दताने कोणी फसवणूक करीत असेल तर त्यांची तक्रार जवळील पोलीस ठाण्यात बांधकाम कामगारांनी करावी. तसेच सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करून कोठेही गर्दी करू नये व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी केले आहे. 


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies