Type Here to Get Search Results !

सोलापूरच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती 


सोलापूरच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती 
माणदेश एक्सप्रेस न्युज
सोलापूर : सोलापूरच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पालकमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारणारे ते तिसरे पालकमंत्री बनणार आहेत.
महाविकास आघाडी सत्तेआल्यावर सुरुवातील पालकमंत्री म्हणून दिलीप वळसे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु कोरोना च्या पार्श्वभूमीवर त्यांची जागी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केली गेली. परंतु सदरची नियुक्ती औटघटकेची ठरली. कारण मंत्री जितेंद्र आव्हाड सध्या रुग्णालयात दाखल झाल्याने जिल्ह्याला पालकमंत्री नव्हता. त्यामुळे त्यामुळे सोलापुरातील पदाधिकाऱ्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून सोलापूर जिल्ह्यासाठी नवीन पालकमंत्री नियुक्त करण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्त करण्यात आली. तसा आदेश आजच म्हणजे दिनांक 22 एप्रिल रोजी शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे आमदार आहेत. त्यांनी गत विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव केला होता. 


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies