दिघंचीतील गरीब, गरजू व अल्पभूधारक कुटुंबांना जीवनाश्यक साहित्याचे कीट मिळावे ; जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे आण्णा रणदिवे यांची निवेदनाद्वारे मागणी


दिघंचीतील गरीब, गरजू व अल्पभूधारक कुटुंबांना जीवनाश्यक साहित्याचे कीट मिळावे ; जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे आण्णा रणदिवे यांची निवेदनाद्वारे मागणी
माणदेश एक्सप्रेस न्युज
दिघंची : दिघंची ता. आटपाडी, जि. सांगली येथील गरीब, गरजू व अल्पभूधारक कुटुंबियांना जीवनावश्यक साहित्याचे कीट मिळावे अशी मागणी आटपाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती व भारतीय जनता पार्टी चे अनुसूचित जाती मोर्चा चे आटपाडी तालुका अध्यक्ष आण्णा रणदिवे यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे दिघंची गावातील गरीब, गरजू व अल्पभूधारक  कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या लोकांना उत्पन्नाचे अन्य कोणतेही साधन नाही. त्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट निर्माण झाले आहे. असून शासन स्तरावर या कुटुंबीयांना अन्नधान्य व संसारोपयोगी साहित्य मिळाले तर त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटेल. त्यामुळे या कुटुंबीयांना तातडीने मदत करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured