दिघंचीच्या मातंग समाजाच्या आदर्श इतर समाजांनी घेण्यासारखा ; नोकरदार वर्गांनी एकत्र येत गोर-गरीब कुटुंबियांना केले जीवनाश्यक साहित्याचे वाटप 


दिघंचीच्या मातंग समाजाच्या आदर्श इतर समाजांनी घेण्यासारखा ; नोकरदार वर्गांनी एकत्र येत गोर-गरीब कुटुंबियांना केले जीवनाश्यक साहित्याचे वाटप 
माणदेश एक्सप्रेस न्युज
दिघंची : दिघंची येथील मातंग समाजातील नोकरदार वर्गांनी एकत्र येत समाजातील समाजातील गोर-गरिबांना जीवनाश्यक वस्तूचे १२० नागरिकांना वाटप करण्यात आले असून या सामाजिक उपक्रमाचा इतर समाजाने आदर्श घेतल्यास समाजातील गोर-गरिबांना आण्णा, बापू, भाऊ, दादा, तात्या, काका, भैय्या या नेत्यांच्या पाया पडण्याची गरजच उरणार नाही. हेच युवा नेते समाजातील आपल्या समर्थकाला जीवनाश्यक वस्तूचे कीट देवून त्याचे फोटोसेशन व जाहिरात मात्र संपूर्ण मतदार संघात करतात.


जीवाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कमर्चारी यांनी केलेल्या कार्याला सलाम !
तू विठ्ठल, मौला, मेरा, तु आसरा सबकुछ मेरा !त्याला फाटा देत दिघंची येथील मातंग समाजातील राहुल रणदिवे, अविनाश आण्णासो रणदिवे,  मंगेश रणदिवे, महादेव रणदिवे यांनी पुढाकार घेऊन मातंग समाजातील गरजू कुटुंबीयांना लॉकडाऊन असल्याने घराबाहेर पडता येत नाही. उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने लोकांची दैना उडाली असताना सामाजिक बांधिलकी जपत व सोशल डिस्टन्स पाळून लोकांना मदत करण्यात आली. यावेळी आटपाडीचे गटविकास अधिकारी मधुकर देशमुख, कृषी विस्तार अधिकारी बाड, ग्रामसेवक धेंडे, कोतवाल शिवाजी पुसावळे यांच्यासह रामभाऊ रणदिवे, नितीन रणदिवे, उमेश रणदिवे, सचिन रणदिवे, दादा रणदिवे, सुमित देवकुळे, धीरज रणदिवे उपस्थित होते. मातंग समाजातील युवकांनी पुढाकार घेऊन केलेल्या कामाबद्दल गावकऱ्यातून अभिनंदन होत आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured