गरजू व गरिबांना किराणा मालाचे वाटप ; माळशिरसचे नगरसेवक संतोष वाघमोडे यांचा उपक्रम


गरजू व गरिबांना किराणा मालाचे वाटप ; माळशिरसचे नगरसेवक संतोष वाघमोडे यांचा उपक्रम
माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे : सध्या देशभरात कोरोना रोगामुळे घबराटीचे वातावरण पसरले आहे. अशातच गोरगरीब नागरीक माञ आर्थिक संकटातून जात त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ही बाब लक्षात येताच माळशिरस नगरपंचायतीचे नगरसेवक संतोष वाघमोडे यांनी त्यांच्या प्रभाग क्रमांक 1४ या वार्डात सुमारे ४०० गरीब कुटूंबांना जीवनाश्यक वस्तूचे वाटप समर्थ मित्र मंडळ व नगरसेवक संतोष वाघमोडे यांच्या संयुक्तविद्यमाने  वाटप करण्यात आले आहे. यावेळी माळशिरस पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वभंर गोल्डे व मुख्याधिकारी डॉ. विश्वनाथ वडजे, पुरवठा अधिकारी चंद्रशेखर लोखंडे, गोदाम पाल सलिम शेख, अॅड.प्रभाकर कुलकर्णी, आण्णासाहेब आमले, सुरेश लवटे, तात्या वाघमोडे,  नाना गोरे, योगेश पुराणिक, डॉ.पंचवाघ,  डॉ. चंदनशिवे, इस्माईल मुलाणी, दिलीप मंजुळे,  उत्तम शेगर, बापू नारनवर आदि उपस्थितीत होते.माळशिरस येथील प्रभाग क्रमांक 1४ येथे फुलेनगर, समर्थनगर, केंगारवस्ती येथील सुमारे ४oo गरीब कुटूंबांना किराणा मालाचे वाटप आले. नागरीकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून लॉकडाऊन काळामध्ये घराबाहेर पडू नये व प्रशासनास सहकार्य करावे.
संतोष वाघमोडे
नगरसेवक 


 


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured