Type Here to Get Search Results !

महिलांना त्रास देणाऱ्या प्रकाश बागल व टोळक्यावर कडक कारवाई करण्याची अग्रणी संस्थेची जिल्हा पोलीस प्रमुखांकडे निवेदनाद्वारे मागणी 


महिलांना त्रास देणाऱ्या प्रकाश बागल व टोळक्यावर कडक कारवाई करण्याची अग्रणी संस्थेची जिल्हा पोलीस प्रमुखांकडे निवेदनाद्वारे मागणी 
माणदेश एक्स्प्रेस न्युज
विटा : लेंगरे येथील महिला पोलिस पाटील  पुष्पाताई बोबडे यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला व विनयभंगाच्या घटनेचा  अग्रणी, विटा या संस्थेच्या वतीने तीव्र निषेध करून महिलांना त्रास देणाऱ्या नीचप्रवृतीवर कडक कारवाईची मागणी निवेदनाद्वारे जिल्हा पोलिस प्रमुख सुहेल शर्मा यांचेकडे करण्यात आली आहे.



लेंगरे ता. खानापूर येथील महिला पोलिस पाटील पुष्पाताई बोबडे  या कर्तव्यदक्ष व प्रामाणिक लोकसेवक आहेत. अतिशय तत्पर व नियमनुसार काम करण्यात त्यांचा हातखंडा आहे. परंतु त्यांच्यावर हल्ला करणारा हा नेत्याचा  बगलबच्चा, गुंडप्रवृतीच्या लोकांचा वरदहस्त व स्थानिक पोलिसांची साथ मिळाल्याने मस्तवाल गावगूंड प्रकाश बागल व टोळक्याची मूजोरी वाढली आहे. अगोदरही बागल गँगने अनेक काळे कारनामे लेंगरे परिसरात केले आहेत. दोन नंबर धंदे, अवैद्य व्यवसाय, काळाबाजार, दहशत, सावकारी, गुंडागिरी  असे कारनामे सतत चालू आहे. त्यामूळे त्याच्या मुसक्या आवळून त्याच्या कडक कारवाई करावी. महिलांना त्रास देण्याची त्याची जुनीच सवय असून, आजपर्यंत कोणतीही महिला भीतीमुळे तक्रार देण्यास तयार नव्हती. परंतू या प्रकारापूढे त्याची अनेक कृष्णकृत्ये बाहेर येतीलच. सध्या पोलीसांनी त्यास फरार घोषीत केले असले तरी तो विटा, लेंगरे परिसरात दडी मारून बसला असल्याची शक्यता आहे. त्यामूळे आपल्या माध्यमातून या गूंड प्रकाश बागलवर कडक कारवाई करावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अग्रणी संस्थेचे  उपाध्यक्ष मनोज कांबळे, संचालक आप्पासाहेब माने, किशोरभाऊ राठोड, शोभाताई लोंढे, शीतल शिंदे, ॲड.शबाना मुल्ला या अग्रणी सोशल फौंडेशन विटाच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आहे.


देशातील, राज्यातील व आपल्या परिसरातील बातम्यासाठी Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies