बचत गटांच्या महिलांना केंद्र व राज्य शासनाने आर्थिक सहाय्य  करावे ; अजय सकट ; बालविकास मंत्री यशोमती ठाकूर व राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे मागणी 


बचत गटांच्या महिलांना केंद्र व राज्य शासनाने आर्थिक सहाय्य  करावे ; अजय सकट


बालविकास मंत्री यशोमती ठाकूर व राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे मागणी 
माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे : माळशिरस तालुक्यातील बचत गटाच्या महिलांचे व्यवसाय बंद असलेने जवळपास तालुका व जिल्ह्यात हजारो महिला उपासमारीने जगत आहेत. या महिलांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने बचत गटांच्या महिलांचे व्याज माफ करावे तसेच त्यांना आर्थिकसाहाय्य अनुदानाच्या माध्यमातून देण्यात यावे अशी मागणी माळशिरस पंचायत समितीचे सदस्य अजय सकट यांनी महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर व राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
माळशिरस तालुक्यातील एकूण बचत गट 3589 असून त्यात एकूण महिलांची संख्या  36,749 आहे. सध्या तालुक्यातील बचत गटाच्या कोरोनोच्या प्रादुर्भावामुळे विविध व्यवसाय बंद असल्याने महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे केंद्र व राज्य सरकार महिला सबलीकरणासाठी मदत करीत असताना अचानकपणे या रोगांचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात वाढल्याने अनेक महिलांना उपासमारीने जगत आहेत. बँकेचा हप्ता जरी 2 महिना भरायचा नसेल पण व्याज, मुद्दल हे राहणारच आहे. त्यात 2 महिने व्यवसाय सुरू होतील की नाही शंका आहे. केंद्र व राज्यसरकारने महिलांना अनुदानरुपी आर्थिक मदत केली तर त्यांचे व्यवसाय सुरळीत चालू राहतील. तसेच शासनाने अल्प दारात शिलाई मशिनची कामे करणाऱ्या महिलांकडून कापडी मास्क शिवून घेतले तर त्यातून त्यांना हातभार लागेल. त्यामुळे शिलाईची ऑर्डर मिळाल्यास त्यांना पुढील दोन ते तीन महिने रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे महिलांच्या काही मागण्याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन मार्ग काढण्याची गरज आहे. बचत गटांचा बँकेचा एप्रिल,मे व जून या कालावधी मधील हफ्ते पूर्णपणे माफ करावीत, रोजंदारी करणाऱ्या महिलांना शासनामार्फत निधी स्वरूपात मदत द्यावी, महिलांना रोजगार संधी उपलब्ध होण्यासाठी महिला बचत गटामार्फत उत्पादित होणाऱ्या वस्तु व माल यांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध होवून मिळावी, शिवभोजन योजनेमार्फत बचत   गटांना भोजन पुरवठा करण्याबाबत गटाची निवड होऊन सदरच्या गटांना रोजगार उपलब्ध होऊन मिळावा, दुग्धव्यवसाय व शेळीपालन करणाऱ्या महिलांना पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा लाभ मिळण्याबाबत प्रयत्न व्हावे. इ. प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. 
राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार,पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली याचा पाठपुरावा पंचायत समितीचे सदस्य अजय सकट प्रयत्न करीत आहेत या निवेदनावर जि प सदस्य बाळासाहेब धाइंजे, विकास धाइंजे, किरण साठे, के.पी. काळे,  डॉ. तुकाराम ठवरे, मारुती देशमुख यांच्या सह्या आहे.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured