चला जोपासू आपले छंद, लॉकडाऊन करा सुसह्य ; प्रशांत चंदनशिवे यांनी जोपासला गायनाचा छंद


चला जोपासू आपले छंद, लॉकडाऊन करा सुसह्य ; प्रशांत चंदनशिवे यांनी जोपासला गायनाचा छंद
माणदेश एक्सप्रेस न्युज
दिघंची/वार्ताहर : सध्या संपूर्ण जगावर कोरणाऱ्या संसर्गजन्य विषाणूमुळे निर्माण झालेल्या जैविकमहामारी वर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून घरी राहून सदर विषाणूला मानवी संपर्कापासून ठरवता येते त्याचाच एक भाग म्हणून शासनाने संपूर्ण भारत देश 22 मार्च 2020 पासून लॉकडाऊन म्हणजेच सर्व व्यवहार व कार्यालय ठप्प ठेवून सर्व नागरिकांना घरी बसण्याची विनंती केलेली आहे.
अशातच प्रशांत चंदनशिवे यांनी आपली गायनाची आवड आपल्या खास शैलीमध्ये आणि एका वेगळ्या अंदाजामध्ये म्हणजेच कुमार सानू स्टाईल ने गाणी गात आहेत. गायनाची आवड त्यांना लहानपणापासूनच आहे.


जीवाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कमर्चारी यांनी केलेल्या कार्याला सलाम !
तू विठ्ठल, मौला, मेरा, तु आसरा सबकुछ मेरा !परंतु या जवळपास दीड महिना सुरू असलेल्या लॉकडाऊन कालावधीमध्ये मिळालेल्या वेळेमध्ये आपले छंद वृद्धिंगत करण्याची संधी प्रशांत चंदनशिवे यांनी सोडलेली नाही. सध्या डिजिटल युगामध्ये अँड्रॉइड फोनच्या माध्यमातून कुमार सानू यांची बेस्ट ऑफ नाईंटीज व किशोर कुमार यांनी गायलेली अजरामर गाणी सध्या ते उस्फूर्तपणे गात आहेत व त्याची चर्चा संपूर्ण जिल्हा व तालुकाभर आहे. श्री चंदनशिवे यांनी सदरची प्रेरणा त्यांचे मित्र सुनील भिंगे, लक्ष्मण चौथे, हरिदास जावीर यांच्याकडून मिळाली.


हे ही वाचा :-  विठ्ठलापूर मध्ये अज्ञाताकडून आकसापोटी वाईट कृत्य


तसेच याकामी त्यांना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर देशमुख व गटशिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी प्रेरणा दिली व सदर चा छंद जोपासल्या बद्दल अभिनंदन केले. ताण तणावातून मुक्तता मिळण्यासाठी संगीताची आवड जोपासा, गाणी म्हणा, गाणी ऐका, आपले आवडते छंद जोपासा चार भिंतीच्या आत राहून आपला आनंद शोधा स्वतःला आनंद मिळेल अशा गोष्टी करत रहा. स्वतः आनंदित रहा आणि इतरांना आनंदित करा डिजिटल साधनांच्या माध्यमातून आपला आवडता छंद जोपासा असे ते म्हणाले.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured