Type Here to Get Search Results !

माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्यासह ३१ जणांवर गुन्हा दाखल  ; संचारबंदी आदेशाचा भंग करून घेतल्या बैठका ; राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल 


माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्यासह ३१ जणांवर गुन्हा दाखल 
संचारबंदी आदेशाचा भंग करून घेतल्या बैठका ; राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल 
माणदेश एक्सप्रेस न्युज
अजनाळे/प्रतिनिधी : संचारबंदी आदेशाचा भंग करून घेतल्या बैठका घेतल्याबद्दल सांगोल्याचे नाते माजी आमदार दीपकआबा साळुंखे यांच्यासह ३१ जणाविरुद्ध तक्रारीवरुन भा. द. वि. क. १८८, २६९, २७०, तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा सन २००५ चे कलम ५१ (ब), महाराष्ट्र पोलीस कायदा सन १९५१ चे कलम ३७(३)/१३५, साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम सन १८९७ चे कलम २, ३ व ४ अन्वये सांगोला पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोना. संजय चंदनशिवे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिका माहिती अशी की, सध्या सर्व जगभरात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता तसेच कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भात पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणु संसर्ग असल्यास त्यात अधिक वाढ होवु न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरीता शासन स्तरावरुन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा सन २००५ हा लागु करण्यात आलेला आहे. मा. जिल्हा दंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोलापुर यांच्या कार्यालयाकडुन क्र. २०२०/ डिसीबी/२/आरआर/२०१९/दि. २८/०३/२०२० अन्वये दि. २८/०३/२०२० रोजीचे १५:०० ते दि. १४/०४/२०२० रोजी २४:०० वा पर्यंत कोराना विषाणुचे वाढत्या प्रादुर्भावामुळे सोलापुर जिल्हयात फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (१) व (३) कलम लागु करण्यात आलेले आहे. मा. शासनाकडील नं.DMU/2020/CR.92/DMU-1 दि. २३/०३/२०२० आणि २४/०३/२०२० अन्वये दि. १४/०४/२०२० अखेर संपुर्ण महाराष्ट्रात लॉकडाउनबाबत घोषणापत्र प्रसिध्द करुन लागु केलेले आहे. त्याप्रमाणे पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, कार्यक्रमांचे आयोजन करणे, लोक एकत्र जमतील अशा सर्व सामाजिक, राजकिय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणीक साहीत्य, सांस्कृतीक, धार्मीक कार्यक्रमाना पुर्णत: बंदी घातली असुन संचारबंदी व संपुर्ण लॉकडाउन केलेले आहे. त्याप्रमाणे जनतेने त्याचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. मा. जिल्हा दंडाधिकारी सो यांनी दिलेल्या आदेशाचा भंग करुन टेंभु योजनेचे उन्हाळी आवर्तनामध्ये चाचणीसाठी सोडण्यात येणारे पाणी जवळा व परीसरातील गावांमध्ये प्राधान्याने सोडावे या मागणीकरीता दि. ०८/०४/२०२० रोजी सय्यद बाबा मठ सोनंद, बुरुंगेवाडी येथील सुभाष बावधाने यांच्या शेतातील पत्रा शेडजवळ, जवळा ता. सांगोला येथील पांडुरंग नारायण साळुखे पाटील यांच्या लिंबु मळयात संयोजक माजी आमदार दिपक (आबा) काकासाहेब साळुखे तसेच विजयकुमार भाउसाहेब देशमुख दोघे रा.जवळा ता.सांगोला यानी स्थानिक शेतकऱ्यांसोबत बैठकी घेतल्या. सदरवेळी त्यानी सोशल डिस्टन्स ठेवले नाही, बैठकीना बंदी असताना बैठकी घेवुन शासकिय आदेशाचा भंग केला म्हणुन दिपक आबा साळुखे पाटील यांच्यासह वेगवेगळया ठिकाणी बैठकीस हजर असलेल्या विजयकुमार भाऊसाहेब देशमुख रा. जवळा, सतीश रामकृष्ण काशीद, महादेव गोविंद पाटील, प्रकाश सुभाष काशीद, साहेबराव एकनाथ काशीद, दिपक राजाराम काशीद, राजाराम लक्ष्मण काशीद, तानाजी हरीबा काशीद, संभाजी गणपती काशीद सर्व रा. सोनंद, सुभाष बाबा बावधाने, श्रीमंत शंकर बुरुंगे, संतोष गंगाधर शेटे, गणेश रमेश माने, सुभाष रावसाहेब बुरुंगे, नितीन विठ्ठल बुरुंगे, मोहन कृष्णा बुरुंगे सर्व रा. बुरुंगेवाडी, पांडुरंग नारायण साळुखे पाटील, वसंत शिवाजी साळुखे, चंद्रकांत नानासाहेब देशमुख, प्रशांत वसंत साळुखे, विश्वास रामचंद्र साळुखे, सज्जन भाउसाहेब गायकवाड, अंकुश गंगाराम कोळी, बळासो सुखदेव कोळी, सुनील सदाशिव साळुखे सर्व रा. जवळा ता. सांगोला लोकांविरुध्द पोना. संजय चंदनशिवे यानी दिलेल्या तक्रारीवरुन भा.द.वि.क. १८८, २६९, २७०, तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा सन २००५ चे कलम ५१ (ब), महाराष्ट्र पोलीस कायदा सन १९५१ चे कलम ३७(३)/१३५, साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम सन १८९७ चे कलम २,३ व ४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 
तसेच दि. ०८/०४/२०२० रोजी रात्री टेंभु योजनेचे पाणी दि. ०८/०४/२०२० रोजी कोळी वस्ती जवळा ता. सांगोला येथे तसेच गुरव वस्ती तळवट जवळा येथे पोहोचल्यानंतर माजी उपसरपंच व इतर लोकानी एकत्र येवुन वरील आदेशाचा भंग करुन पाण्याचे पुजन केलेले आहे त्याबाबत वा माजी उपसरपंच आप्पासाहेब दादा भिमराव देशमुख, संजय भरत साळुखे, वैभव रामराव देशमुख, नवनाथ बुरुंगे, प्रशांत वसंतराव साळुखे पाटील सर्व रा. जवळा ता. सांगोला यांच्याविरुध्द सांगोला पोलीस ठाणेस पोना.संजय चंदनशिवे यानी दिलेल्या तक्रारीवरुन भा.द.वि.क.१८८, २६९, २७०, तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा सन २००५ चे कलम ५१ (ब), महाराष्ट्र पोलीस कायदा सन १९५१ चे कलम ३७(३)/१३५, साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम सन १८९७ चे कलम २, ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सांगोला पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नागरिकांना समज देण्यात येते की, संचारबंदी व लॉक डाउन कालावधीत मा. जिल्हाधिकारी सो यांनी दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे, कोणीही रस्त्यावर येवु नये, अन्यथा आपल्याविरुध्द वरीलप्रमाणे कायदेशीर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात येतील याची सर्वानी नोंद घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies