अजनाळेत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत तांदूळ वाटप 


अजनाळेत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत तांदूळ वाटप 
माणदेश एक्सप्रेस न्युज
अजनाळे/सचिन धांडोरे : अजनाळे ता. सांगोला, जि. सोलापूर येथे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत यश राजे महिला बचत गट अजनाळे संचलित स्वस्त रेशन धान्य दुकान व विकास सेवा सोसायटी अजनाळे अंतर्गत स्वस्त रेशन धान्य दुकान या रास्त भाव धान्य दुकानांमध्ये मोफत तांदूळ सर्व रेशनकार्डधारकांना दिल्याची माहिती संजय येलपले व संजय कोळवले यांनी दिली. 
राज्यामध्ये संचारबंदी व लॉकडाऊन लागू असल्यामुळे  गोर गरीब कुटुंबांना  रोजगार उपलब्ध नसल्यामुळे शासनाने  प्रतिव्यक्तीस ५ किलो मोफत तांदूळ दिल्याने गोरगरिबांना आधार मिळाला आहे. याप्रसंगी गाव कामगार तलाठी किरण बाडीवाले, कोतवाल नवनाथ इंगोले, पोलीस पाटील संतोष भंडगे, पत्रकार सचिन धांडोरे यांच्यासह  मान्यवर उपस्थित होते. 


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured