Type Here to Get Search Results !

निंबवड्यात होम क्वारंनटाईन केलेल्यांच्या मदतीला धावले आरोग्य अधिकारी ; शिधा वाटप करून दानतीचा आदर्श !


निंबवड्यात होम क्वारंनटाईन केलेल्यांच्या मदतीला धावले आरोग्य अधिकारी ; शिधा वाटप करून दानतीचा आदर्श !
माणदेश एक्सप्रेस न्युज
निंबवडे/राघव मेटकरी : निंबवडे ता. आटपाडी, जि. सांगली येथे अहोरात्र डोळ्यात तेल घालून आरोग्य सेवा करत असलेले संजय कदम व आरोग्यसेविका एस.एस. तळापे यांनी निंबवडे येथे विविध भागातून आलेल्या जवळपास आठ कुटुंबाला होम क्वारंनटाईन असून त्या कुटुंबाला किराणा मालाचे किट त्यांच्या वतीने देण्यात आले त्याबद्दल गावकऱ्यांनी आरोग्यसेवक व आरोग्यसेविका यांच्या कृतज्ञेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. 




निंबवडे गावातील बहुतांश नागरिक संपूर्ण सहकार्य करत असून काही लोक मात्र अनावश्यक फिरताना प्रशासकीय यंत्रणेवर ताण वाढवत आहे. याबाबत बोलताना पोलीस पाटील यांनी सांगितले की, शिकलेल्या लोकांचा अडाणीपणा जास्त घातक होऊ शकतो. तसेच बाहेर गावाहून आलेल्या लोकांनी सतर्कता बाळगावी कारण ते जास्त घातक असल्याचे ते म्हणाले. सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यानी केले.  



आम्ही आपल्या सुरक्षिततेसाठी देखभाल करण्यासाठी रस्त्यावर आहोत काळजी करू नये. परंतु प्रशासकीय नियम सुद्धा पाळणे गरजेचे आहे. कुणीही कोणतीही गोष्ट करताना वेळेला गृहीत धरू नये. सहकार्य करावे.
संजय कदम
आरोग्यसेवक


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies