रेठरे धरण येथील आणखी सहा जणांची कोरोना चाचणी निगेटीव्ह : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

रेठरे धरण येथील आणखी सहा जणांची कोरोना चाचणी निगेटीव्ह : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

रेठरे धरण येथील आणखी सहा जणांची कोरोना चाचणी निगेटीव्ह : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली :  रेठरे धरण येथे राहून गेल्यानंतर मुंबईत कोरोना बाधीत ठरलेल्या व्यक्तीशी संबंधित निकटवर्तीयांपैकी आणखी 6 जणांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. रेठरे धरण येथील व्यक्ती मुंबईत गेल्यानंतर कोरोना बाधीत असल्याचे निश्चित झाल्यानंतर प्रशासनाने गतीमान हालचाली करून निकटच्या संपर्क बाधितांना मिरज येथे आयसोलेशन कक्षात दाखल केले. कोरोना चाचणीसाठी स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यामध्ये एकूण 30 जणांची तपासणी करण्यात आली. यातील 24 जणांचे अहवाल पूर्वीच निगेटीव्ह आले आहेत. उर्वरित 6 जणांचे अहवाल आज निगेटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. 

Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free

Post a comment

0 Comments