Type Here to Get Search Results !

म्हसवडमध्ये तीन दिवस मेडिकल व दवाखाने वगळता सर्व सेवा बंद 


म्हसवडमध्ये तीन दिवस मेडिकल व दवाखाने वगळता सर्व सेवा बंद 
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला : महाराष्ट्र शासनाने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर संचारबंदी, १४४ कलम लावून जमावबंदी करुन हि लोक बाहेर पडत असल्याने अखेर म्हसवडचे नगरसेवक व पोलीस यांनी ३ दिवस सगळे व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मेडिकल दुकाने यातून वगळली आहेत. किराणा, धान्य, दुध, फळे व भाजीपाला तीन दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 
म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी म्हसवड पोलिस ठाण्याचे सपोनि गणेश वाघमोडे, नगराध्यक्ष भगतसिंह विरकर, मुख्याधिकारी डॉ चेतना केरूरे, तालुका वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण कोडलकर, आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी काकडे व शेळके, युवराज सुर्यवंशी, कैलास भोरे, डॉ राजेंद्र मोडासे, राहुल मंगरुळे  हे उपस्थित होते.
 महाराष्ट्र शासनाने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर संचारबंदी असूनही लोक बाहेर पडत असल्याने  लॉकडाऊन ही करुन पाहिले मात्र लोक काही केल्या ऐकत नसल्याने दि. १ रोजी  जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने दुचाकी, चार चाकी रस्त्यावर दिसताच   धडक‌ कारवाई करुन वाहन जप्त करण्याची अंमलबजावणी म्हसवड पोलिसांनी सुरु करुन तब्बल १४० दुचाकी व ४ चाकी वाहनावर कारवाई सपोनि गणेश वाघमोडे व त्यांचे सहकारी यांनी केली.
अत्यावश्यक सेवेच्या नावावर व किराणा दुकानाच्या नावावर अनेक अनाधिकृत व्यवसाय सुरु असल्याने व फळ भाजीपाला परवाना नावावर अनेक चार चाकी वाहनातुन अत्यावश्यक सेवेच्या आडुन वेगळाच व्यवसाय चार चाकी टमटम मधुन सुरु असल्याचे दिसून आले. दि.२  एप्रिल  पासुन मेडिकल व दवाखाने हेच फक्त अत्यावश्यक सेवा  चालू राहतील बाकी किराणा, धान्य, दुध, फळे व भाजीपाला तीन दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies