Type Here to Get Search Results !

सौरभ भोसले याचेकडून फुट प्रेस सॅनिटाइजर उपकरणाची निर्मिती ; आंध्र प्रदेश सरकार कडून या उपकरणाचे कौतुक ; शेटफळे येथील युवा उद्योजक शिवप्रताप गायकवाड यांचा सौरभ भाचा 


सौरभ भोसले याचेकडून फुट प्रेस सॅनिटाइजर उपकरणाची निर्मिती ; आंध्र प्रदेश सरकार कडून या उपकरणाचे कौतुक ; शेटफळे येथील युवा उद्योजक शिवप्रताप गायकवाड यांचा सौरभ भाचा 
माणदेश एक्स्प्रेस न्यूज
आटपाडी/प्रतिनिधी : सध्या देशामध्ये व राज्यात कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे संचारबंदी लागू करण्यात आली असून संपूर्ण देशच लॉकडाऊन करण्यात आला आहे. प्रत्येकजण या संकटावर मात करण्यासाठी आपापल्या परीने योगदान देत आहेत. 


शेटफळे ता. आटपाडी, जि.सांगली येथील युवा उद्योजक शिवप्रताप गायकवाड यांचा भाचा कु. सौरभ भोसले याने कोरोना या विषाणू वर मात करण्यासाठी त्याने फुट प्रेस सॅनिटाइजर या उपकरणाची निर्मिती केली आहे. या उपकरणामुळे हाताचा सॅनिटायझर च्या बाटलीला कोणताही स्पर्श न करता केवळ पायाने पैडल दाबल्यास त्याद्वारे हातवर सॅनिटायझरची फवारणी होणार आहे. त्यामुळे कितीही लोकांना या उपकरणाद्वारे सॅनिटायझरची फवारणी केली असता संसर्ग टाळता येणार आहे.


जीवाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कमर्चारी यांनी केलेल्या कार्याला सलाम!
*तू विठ्ठल, मौला, मेरा, तु आसरा सबकुछ मेरा ! आभार गीत



सौरभ भोसले यांच्या या उपकरणाचे कौतुक आंध्रप्रदेश सरकारने केले आहे. या उपकरणाला राज्यातून मागणी होत आहे. राज्यातील तसेच देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीने या उपकरणाची खरेदी करून गावातील प्रत्येक चौकात व गल्लीत हे उपकरण उभा करून त्यास सॅनिटायझरची बाटली लावल्यास लोकांना त्याचा फायदा होणार आहे व कोरोनाचा फैलाव कमी होण्यास मदत होणार आहे. सध्या सौरभ भोसले हा राजारामबापु इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूर येथे शिक्षण घेत आहे.


देशातील, राज्यातील व आपल्या परिसरातील बातम्यासाठी Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies