कोळा येथे डॉ. आंबेडकर संस्थेच्या वतीने गरजुंना धान्य वाटप

कोळा येथे डॉ. आंबेडकर संस्थेच्या वतीने गरजुंना धान्य वाटप


कोळा येथे डॉ. आंबेडकर संस्थेच्या वतीने गरजुंना धान्य वाटप
माणदेश एक्सप्रेस न्युज
कोळा : डॉ. आंबेडकर शेती विकास संशोधन संस्थेच्या वतीने कोळा ता. सांगोला येथील गरजु कुटूंबांना सोशल डिस्टंसिंग राखत धान्य वाटप करण्यात आले. कोरोना विषाणुमुळे संपुर्ण देशासह राज्यात संचारबंदी असल्यामुळे रोजगार, कामधंदा थांबल्यामुळे हातावर पोट असणार्यांषवर उपासमारीची वेळ आल्याने त्यांना मदतीचा हात म्हणुन धान्य व जिवनावश्यक वस्तुंचे  किट देण्यात आले. यामध्ये 5 किलो गहु, 2 किलो तांदुळ, 1 किलो तुरडाळ, 1 किलो तेल प्रती कुटूंबास देण्यात आले. समाजातील एकल महिला, विधवा, परितक्त्या, अपंग, शेतमजुर, स्थलांतरीत लोकांना वस्तुंचे वाटप करण्यात आलेे. यावेळी कोळा गावचे सरपंच शहाजी हातेकर, ग्रा. सदस्य संभाजी गोडसे, विजय आलदर, उत्तम आलदर, जगदीश कुलकर्णी, विशाल मोरे आदि उपस्थीत होते.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments